घाटशिरस येथे आदिनाथ महाराज पालवे यांच्या हस्ते कांचनेश्वर महाराजांच्या समाधीस अभिषेक

पाथर्डी (प्रतिनिधी ) पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथील श्री कांचनेश्वर महाराज यांच्या समाधीवर अभिषेक घालण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. घाटशिरस येथील ह.भ. प. आदिनाथ महाराज पालवे यांच्या शुभहस्ते अभिषेक घालण्यात आला.यावेळी सुरेशगिरी महाराज,केतनगिरी महाराज,लखनगिरी महाराज,राधेश्याम महाराज,कारभारी महाराज,भागवत पुजारी महाराज,साहेबराव महाराज,देशस्तंभ न्यूज नेटवर्कचे उपसंपादक सुरेश भिंगारदिवे,जिल्हा प्रतिनिधी गौतमी भिंगारदिवे आदी उपस्थित होते.यावेळी बोलतांना आदिनाथ महाराज पालवे म्हणाले,भगवान शंकराने सोन्याची मुद्रा येथे ठेवली होती त्यावरून कांचनेश्वर हे नाव पडले आहे. त्यानंतर भगवान शंकर हे वृदेश्वर येथे गेले.
यावेळी चैतन्यधाम सोनारवस्ती धरणगाव कोपरगाव येथील दत्तरेश्वर दिंडीचे आगमन झाले. किर्तन संपल्यानंतर दिंडीस ,उपस्थित मान्यवर व नागरिकांना भोजनदान देण्यात आले. कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.