देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि: 9 जुलै 2025: 4 जून 2024 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 जणांच्या सोन साखळ्या, व खिशातील पकिटांवर डल्ला मारणारे चोरटे 1वर्ष होऊनही मोकाटच फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. या बाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
याबाबत रिपब्लिकन सेनेने नुकतीच पत्रकार परिषद आयोजित केली होती, पत्रकार परिषदेत जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे, शहर उपाध्यक्ष विवेक विधाते, सामाजिक कार्यकर्ते संजय ताकवले, सत्यवान नवगिरे, विकास रणदिवे, सुनील गट्टानी, महिला आघाडी शहर अध्यक्ष सुनीता शिंदे, नेहा जावळे, बेबीताई टकले आदी उपस्थित होते.
याबाबतची अधिक माहिती अशी की 4 जून 2024 रोजी शिर्डी आणि नगर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी एमआयडीसी येथील वखार महा मंडळाच्या गोडाऊन मध्ये झाली. निवडणूक निकाल ऐकण्यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर मोठया प्रमाणात गर्दी होती. त्यावेळेस नगर लोकसभा मतदार संघातून खासदार निलेश लंके यांना विजयी घोषित करण्यात आले. व वेळात त्यांची विजयी मिरवणूक निघाली, या मिरवणूकित मोठी गर्दी होती, यावेळी बोलतांना सुनील शिंदे म्हणाले
गर्दीचा फायदा घेत चोरट्यानी 12 जणांच्या सोन्याच्या चेन व खिशातील पैशाची पाकिटे चोरली गेली, ही बाब तक्रारदारांच्या लक्षात आल्यावर तक्रारदारानी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या, याबाबतीत राजेंद्र वसंत शिंदे ( रा.पाथर्डी) याला संशयित गुन्हेगार म्हूणन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर संशयित गुन्हेगारांचे अनेक फोटो व व्हिडीओ स्वरूपातील पुरावे एमआयडीसी पोलिसांना सादर करण्यात आले. सदर घटना घडल्यानंतर पोलिसांचा तपास अगदी शून्य गतीने सुरु असल्याचे लक्षात येताच पीडितानी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत तपासा बाबत नाराजी व्यक्त केली होती.
याच दिवशी 4 जून रोजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजयी मिरवणुकीत देखील असाच काहीसा प्रकार झाला होता. तिथे 27 लाख 78 हजारांच्या सोन्याच्या साखळया चोरट्यानी लंपास केल्या होत्या, त्यावेळेस गुन्हा दाखल झाल्यानंतर सातारा पोलिसांनी अवघ्या काही दिवसात चोरीस गेलेले सोने हस्तगत करत चोरट्याना जेरबंद केले होते. सातारा पोलिसांना जे जमले ते एमआयडीसी पोलिसांना का जमत नाही? असा प्रश्नही उपस्थित रिपब्लिकन सेनेने आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
तसेच 12 जणांच्या सोन्याच्या चेन चोरी गेलेल्या असतांना 12 जणांची फिर्याद घेण्या ऐवजी फक्त दोनच जणांची फिर्याद का घेण्यात आली? असा सवाल उपस्थित करण्यात आला याबाबत एमआयडीसी पोलिसांच्या कार्य पद्धतीवर संशय व्यक्त होत असल्याचे पत्रकार परिषदेत म्हंटले आहे.
सदर घटनेचा तपास लवकर होत नसल्याने घटनेच्या सहा महिन्यानंतर दि. 20 डिसेंबर 2024 रोजी एमआयडीसी पोलिसां कडून स्थनिक गुन्हे शाखेकडे गुन्हा वर्ग करावा,असे पत्र पीडिताकडून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आले होते.
या गंभीर घटनेच्या बाबतीत रिपब्लिकन सेना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन
सदर गुन्ह्यातील तपास अधिकारी, व गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना कठोर कारवाई करत निलंबित करावे.तसेच
सदर तपास एलसीबी कडे वर्ग करण्यात यावा. अशी मागणी करणार असून सदर प्रकरणी लवकर पीडिताना न्याय मिळाला नाही, तर मुबंई येथे जाऊन मुख्यमंत्री, गृह मंत्री यांना देखील भेटणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा