केडगावात नेत्ररोग चिकित्सा शिबिराचे आयोजन केडगाव जागरूक नागरिक मंच चा उपक्रम

केडगाव दि.९ जून (प्रतिनिधी)
केडगांव जागरूक नागरिक मंच आयोजित जागतिक दृष्टिदान दिनाचे औचित्य साधून स्वास्तिक नेत्रालय व वैष्णवी ऑप्टिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्ररोग चिकित्सा शिबिराचे आयोजन शुक्रवार दि. १० मे रोजी बालाजी कॉलनी केडगाव येथील बागले हॉस्पिटल या ठिकाणी सकाळी १० ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान करण्यात आले आहे. यावेळी डोळ्यांच्या विविध समस्या व डोळ्यांचे विकारासंबंधी डोळ्यांची मोफत तपासणी नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रफुल्ल चौधरी करणार आहेत. तसेच अत्यल्प दरात वैष्णवी ऑप्टिकल च्या वैष्णवी जरबंडी नागरिकांना नंबरचे चष्मे उपलब्ध करणार आहेत. मंचचे अध्यक्ष विशाल
पाचारणे यांनी नेत्रदान इच्छुकांसाठी कार्यक्रम स्थळी फॉर्म उपलब्ध असण्याची माहिती दिली. तसेच डॉ. सुभाष बागले हॉस्पिटल च्या वतीने रक्तदाब व ऑक्सिजनची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. शिबिरासाठी मंचचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.