सदिच्छा मंडळाच्या नेतेपदी राजेंद्र शिंदे सदिच्छा मंडळ स्वबळावर लढवणार निवडणूक

अहमदनगर दि.१० जून (प्रतिनिधी)
शिक्षक बँकेची निवडणूक जवळ आल्याने सर्वच मंडळे कंबर कसून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.जिल्ह्यातील सर्वात जुने असलेल्या सदिच्छा मंडळाने एक पाऊल पुढे टाकत उमेदवार चाचपणी व निवडणूक नियोजन मेळावा नगर येथे उत्साहात आयोजित केला होता.या मेळाव्यास बहुसंख्येने सदिच्छा प्रेमी उपस्थित होते.
या सभेत श्री.रवींद्र पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदिच्छा मंडळाच्या नेतेपदी राजेंद्र शिंदे यांची एक मतांनी निवड करण्यात आली.या निर्णयाचे सर्व सदिच्छा प्रेमींनी स्वागत केले आहे. तसेच श्री.राजेंद्र शिंदे यांची नेतेपदी निवड झाल्याने शिक्षकी राजकारणातील चाणक्य समजले जाणारे राजेंद्र शिंदे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्व सभासदांचे लक्ष लागले आहे.नेतेपदी निवड झाल्यानंतर राजेंद्र शिंदे यांनी सदिच्छा मंडळ सर्व जागा स्वबळावर लढवणार असल्याचा पुनरुच्चार केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी उच्चाधिकार समितीचे जिल्हाध्यक्ष श्री.गजानन ढवळे होते.
यावेळी बोलताना रवींद्र पिंपळे यांनी सदिच्छा मंडळ हे मातृमंडळ असून सर्व मंडळांना याच मंडळातुन जन्म झाला आहे.सदिच्छा मंडळाची विचारसरणी अनुसरणारा मोठा सभासद वर्ग असून हा वर्ग सदिच्छा मंडळासोबत राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.यावेळी जिल्हानेते व माजी संचालक श्री.विनोद फलके,श्री.पांडुरंग काळे,श्री.बाळासाहेब साळुंके आदींनी मंडळाची जोरदार भूमिका विशद केली.संघाचे जिल्हाध्यक्ष श्री.माधव हासे,मंडळाचे अध्यक्ष श्री.नारायण राऊत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना निवडणूकिला कशा प्रकारे सदिच्छा मंडळ सामोरे जाणार याविषयी मार्गदर्शन केले.
या मेळाव्यास श्री.रहिमान शेख,श्री.बबन गाडेकर,दक्षिण जिल्हा प्रमुख श्री.भास्कर कराळे,उत्तर जिल्हा प्रमुख श्री.चंद्रकांत मोरे,श्री.राजाभाऊ बेहळे,श्री.बाबा आव्हाड,श्री.पुरुषोत्तम आंधळे,श्री.दादा वाघमाजी चेअरमन श्री.नवनाथ तोडमल,पदवीधरचे जिल्हाध्यक्ष श्री.रहिमान शेख,नगरपालिका संघाचे श्री.भाऊसाहेब कबाडी,माजी विश्वस्त श्री.बाळासाहेब साळुंके,श्री.बबन गाडेकर,बाळासाहेब डमाळ, गणेश मोटेमाजी चेअरमन श्री.महादेव गांगर्डे,माजी संचालक श्री. विनोद फलके, राजेंद्र शिंदे, पांडुरंग काळे, माजी चेअरमन श्री.संतोष दळे सर, माजी व्हॉईस चेअरमन श्री.संजय पवार,श्री.भुजबळ सर,श्री.राजेंद्र कुदनर,श्री.राजाभाऊ बेहेळे,श्री.सतीश आव्हाड,श्री.शिवाजी आव्हाड सर,श्री.संदीप पोखरकर,श्री.अनिल कराड,श्री.अविनाश भालेराव,श्री.सय्यद अली सर,श्री.चंद्रकांत मोढवे,श्री.राजेश बनकर,श्री.भाऊसाहेब घुले,श्री.नवनाथ काळे,श्री. काटे, राजेंद्र ढोले,श्री.उद्धव थोरात,असे अनेक सदिच्छा मंडळाचे वजनदार शिलेदार उपस्थित होते.बहुसंख्य सदिच्छा प्रेमींनी आपले बहुमोल मार्गदर्शन तालुक्यातील सभासादापर्यंत पोहचवून सभासदांना अवगत करण्याचे ठरले.मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी परिश्रम घेतले.