रखमा पाटील हे पठार भागातील नेते नाही तर माझ्या घरचा सदस्य हरपला : आमदार राधाकृष्ण विखे

मांडवे (प्रतिनिधी)
संगमनेर तालुक्यातील डीग्रस गावचे विकास पुरुष विद्यमान सरपंच रखमा बाळाजी पाटील खेमनर, यांच हृदय विकाराच्या झटक्याने 28- मे ला दुःखद निधन झालं, तर त्यांचा दशक्रिया विधी 6 जून ला डिग्रस येथे पार पडला.त्यांच्या जाण्याने अश्वी पठार भाग संगमनेर तालुका, लोणी प्रवरा परिसर,अशा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला, पठार भागातील गोरगरीब जनतेसाठी रखमा पाटील हे नेहमी सातत्याने पुढे असायचे, कुणाचं घरच भाडंन जरी असेल तर ते घरात बसून मिटवायचे , रखमा पाटील हे पठार भागातील नेते नाही तर माझ्या घरचा सदस्य हरपला अशी भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्र राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाहिली.
यावेळी अहमदनगर जिल्हा बँकेचे माजी चेअरमन बाजीराव पाटील खेमनर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकराव पाटील खेमनर, संगमनेर पंचायत समितीचे सदस्य विरोधीपक्षनेते सरुंनाथ उंबरकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मीराताई शेटे, भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत पाटील खेमनर, मांची हिल संस्थापक अध्यक्ष शाळीग्राम होडगर, दानशूर व्यक्तीमहत्व बाबासाहेब कुटे, अधिकरावं भगवंता खेमनर, बाबासाहेब भोसले, लक्ष्मणराव कुटे, गणपतराव सांगळे, एडवोकेट अशोक हजारे, शरद नाना थोरात,सुभाष पाटील खेमनर, किशोर पाटील खेमनर,आदींची उपस्थिती होती.
…. माझ्याकडे कुठल जरी काम असेल तर रखमा पाटील हे बसून काम करून घ्यायचे,तर रखमा पाटील स्वतःसाठी कधीच काही मागितले नाही, नेहमी जनतेसाठी काम केले, अस दशक्रिया विधी या निमित्त बोलताना आमदार राधाकृष्ण विखे हे बोलत होते. तर त्यांच्या पाठीमागे त्यांचा परिवार,
भाऊ – 1) लिंबाजी बाळाजी खेमनर.
2) देवराम बाळाजी खेमनर.
बहीण – 1) रेऊबाई किसनराव चांडे
मुलगा – 1) अशोक रखमा खेमनर.
मुली – 1) राजहंस दूध संघाच्या सचालिका ताराबाई रेवजी पाटील धुळगंड
2) मिराबाई जानकीराम पुणेकर.
पुतणे – 1) शरद लिंबाजी खेमनर, कार्तिक स्वामी लिंबाजी खेमनर, रितेश शिवाजी खेमनर, हीतेश देवराम खेमनर,
नातू – 1) दिग्विजय अशोक खेमनर, यशवर्धन शरद खेमनर, दिप वर्धन खेमनर.
…… असा मोठा परिवार आहे, तर त्यांच्या अंत्यविधीच्या दोन दिवसानंतर सांत्वनासाठी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी भेट देऊन सांत्वन केले, यावेळी उपस्थित जनार्दन पाटील आहेर, बूवाजी पाटील खेमनर, बाळासाहेब कोंडाजी खेमनर, बुवाजी बाबा पुणेकर, योगेश खेमनर, शिंदोडी गावचे माजी सरपंच लक्ष्मण कुदनर, शिवसेना नेते गुलाब राजे भोसले, भाऊसाहेब डोलनर. यांची उपस्थिती होती.