प्रशासकिय

अहमदनगर जिल्‍ह्यात अमृत सरोवर अभियान योजनेचा आरंभ

अहमदनगर दि.08 (प्रतिनिधी) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत देशात २४ एप्रिल ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये अमृत सरोवर अभियान योजना राबविण्यात येत असुन, जिल्हयात किमान ७५ अमृत सरोवर निर्मितीचे उद्दीष्टे असून अहमदनगर जिल्हयात या योजनेत मृद व जलसंधारण विभाग व जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाकडील ७५ पाझर तलाव दुरुस्ती कामांची निवड करण्यात आलेली आहे. यातील किमान १५ कामे १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत पुर्ण करण्यात येणार आहेत. मृद व जलसंधारण विभागामार्फत त्यातील पारनेर तालुक्यातील हंगा येथिल प्रगतीपथावर असलेल्या पिंपळओढा पाझर तलाव दुरुस्तीच्या कामास आज मा. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी भेट दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी रोहयो उदय किसवे, प्रांताधिकारी श्री. सुधाकर भोसले, गटविकास अधिकारी किशोर माने, जलसंधारण अधिकारी ऋषिकेश चव्हाण, सरपंच जयदिप साठे, ग्रामस्थ व लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. येरेकर यांनी उपस्थित शेतकरी व ग्रामस्थ यांच्याबरोबर संवाद साधला व कामाची आवश्यकता, गुणवत्ता व काम पुर्ण झाल्यानंतर होणा-या पुर्नस्थापित पाणीसाठयाबाबत विचारणा केली. ग्रामस्थ व लाभार्थी शेतकरी यांनी याबाबत समाधान व्यक्त केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे