प्रशासकिय

अहिल्यानगर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत! महानगर पालिका प्रशासनाची माहिती, नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, प्रशासनाचे आवाहन!

 

 

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर :दि. 8 फेब्रुवारी: महावितरण विभागाकडून महत्त्वाच्या कामासाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरातील पाणीपुरवठा विस्कळीत होऊन एक दिवस विलंबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
महावितरण विभागाकडून देखभाल व दुरूस्तीच्या कामासाठी आज सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात आला. दरम्यान, या काळात मुळानगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहिल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता आल्या नाही.
त्यामुळे शनिवार (ता. 7) रोजी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्ता, पाइपलाइन रस्ता, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच सारसनगर, बुरूडगाव रस्ता,
केडगाव, नगर-कल्याण रस्त्यांवरील शिवाजीनगर परिसर भागास सकाळी 11 नंतरच्या पाणी वाटपाच्या भागात पाणी पुरवठा होऊ शकला नाही.
हा पाणी पुरवठा रविवार (ता. 8)
रोजी करण्यात येणार आहे. तसेच रविवारी पाणी पुरवठा होऊ घातलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागात
म्हणजेच मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रस्ता, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, टी. व्ही. सेंटर परिसर, म्युनिसीपल हाडको, स्टेशन रस्ता, आगरकर मळा, विनायक नगर भागात महापालिकेमार्फत पाणी पुरवठा करण्यात येणार नाही. या भागातील
पाणी पुरवठा हा रविवार ऐवजी सोमवार (ता. 9) रोजी करण्यात येईल. तसेच सोमवारी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने महापालिका कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रस्ता परिसर, सावेडी भागात महापालिकेतर्फे पाणीपुरवठा करण्यात येणार नाही, या भागातील पाणीपुरवठा हा सोमवार ऐवजी मंगळवार (ता. 10) रोजी करण्यात येणार आहे.
तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन, पाण्याचा वापर काटकसरीने करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मनपा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे