सर्वधर्मीय नागरिकांच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन
भिंगार येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीत घडलेल्या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून आरोपींवर 307 प्रमाणे गुन्हे दाखल करण्याची मागणी - मतीन सय्यद

अअहमदनगर दि.२०(प्रतिनिधी)- डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भिंगार येथे काही समाजकंटकांनी जातीय तेढ निर्माण करून अनुचित प्रकार घडविला त्याबद्दल भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे सुनील सोनवणे यांच्यामार्फत खोटा ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याची सखोल चौकशी होण्यासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन देताना मतीन सय्यद, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाअध्यक्ष प्रतीक बारसे, नूर शेख, महासचिव योगेश साठे, शहर अध्यक्ष संजय जगताप, शहर उपाध्यक्ष प्रवीण ओरे, जीवन पारधे, सुनील भिंगारदिवे, शौकत सय्यद, वसीम सय्यद, अमजद शेख, मुशीर शेख, साजिद हाफीज, अतीक शेख, शहानवाज काजी, सलमान शेख, लतीफ शेख, फिरोज शेख, मोईन शेख, समीर शेख, अमन शेख, फरास शेख आदीसह भिंगार येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भिंगार येथील सर्वधर्मीय नागरिकांच्या वतीने 14 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती असल्याने आंबेडकर अनुयायी बांधवांनी भिंगार शहरातील मिरवणूक काढली होती. त्या मिरवणुकीत दर सालाबाद प्रमाणे मुस्लिम बांधव यांनी आंबेडकर अनुयायी बांधव यांना शुभेच्छा देऊन व मिरवणुकीत सहभागी होऊन उत्सव साजरा करत. सामाजिक कार्यकर्ते आकाश भिंगारदिवे व इतर कार्यकर्ते हिरवा झेंडा हातात घेऊन डीजे चालू असताना नाचत होते. व मुस्लीम बांधव हे निळा झेंडा हातात घेऊन आनंदोत्सव साजरा करीत होते. भिंगार वेशीजवळ स्वामी पान सेंटर समोर डीजे सिस्टीम चालू होता. मिरवणूक त्या ठिकाणी आली असता. अचानक काही मुले भगवा झेंडा घेऊन मिरवणुकीत सामील झाले व त्यांनी मुस्लिम बांधवांना धक्काबुक्की करून एका कार्यकर्त्यांच्या हाती निळा आणि हिरवा झेंडा एकत्र असताना तो जमीनीवर खाली पाडून मोठ्या मोठ्याने दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे घोषणा देऊन शांतता भंग करून फैसल खान व मुक्तार शेख यांना सुनील सोनवणे, शिवा भागानगरे, आशिष क्षेत्रे, आकाश क्षेत्रे, सोनू झुंबर गायकवाड, रोहित लंगोटे, सागर शिंदे, गिरीश कैलास बारसे, गणेश नामदे या सगळ्यांनी संगम मताने कट रचून जीवघेणा हल्ला केला व त्या हल्ल्यात फैसल व मुक्तार हे दोघे गंभीर रित्या जखमी झाले आहे. सध्या त्यांचे रुग्णालयांमध्ये उपचार चालू असून सदर आरोपी विरोधात हुसेन रहेमान खान यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी गेले असता फिर्याद तातडीने दाखल करून जाणून-बुजून रात्री उशिरा फिर्याद दाखल करून घेतली मात्र गंभीर इजा झालेल्या असताना ही आरोपीविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल न करता जामीनपात्र कलम लावलेली आहे. फिर्याद दाखल केली म्हणून राग मनात ठेऊन सुनील सोनवणे यांनी शादाब, मुक्तार, फैसल, तोसिफ, अरबाज, निसार इतर लोकांच्या विरोधात खोटी ॲट्रॉसिटी ची फिर्याद दाखल केली आहे. सदर खोटी फिर्याद मुळे मुस्लिम समाजाबद्दल इतर समाजात चुकीचा संदेश गेले आहे. कि दोन समाजात वाद होऊन मिरवणुकीत अडथळा निर्माण केल्याचा चित्र जाणून-बुजून निर्माण केलेला आहे. खरी परिस्थिती वरील प्रमाणे आहे. मुस्लिम बांधव व आंबेडकर अनुयायी गुण्यागोविंदाने असून त्यांच्यात कुठल्याही प्रकारे वाद किंवा मतभेद नसताना लोकांच्या मनात मुस्लिम समाजाबद्दल द्रोषाची भावना निर्माण होऊ शकते व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सदर प्रकरणाची वरिष्ठ मार्फत सखोल चौकशी होऊन खोटी फिर्याद दाखल करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी व ॲट्रॉसिटी कलम रद्द करण्यात यावे तसेच आरोपींवर 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.