ब्रेकिंग

जिल्हा उपनिबंधक कार्यालयात 25 वर्षांपासून कार्यरत असलेला “तो ” कर्मचारी सावकाराची घेतोय बाजू! तक्रारदाराच्या पत्नीचा संशय, मांडली जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे कैफियत! रिपब्लिकन सेना सावकारी व्याज भरून बेघर झालेल्या “त्या ” पिडित कुटूंबाच्या पाठीशी!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 23 जानेवारी : जिल्हा उपनिबंधक कार्यालयात 25 वर्षांपासून कार्यरत असलेला “तो ” कर्मचारी सावकाराची बाजू घेत असल्याचा संशय तक्रारदार विशाल निमसे यांच्या पत्नीने व्यक्त केला आहे. याबाबत तक्रारदाराची पत्नी वैशाली निमसे यांनी रिपब्लिकन सेनेच्या समवेत जिल्हा निबंधक यांना कैफियत मांडत निवेदन दिले. यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे, शहर अध्यक्षा सुनीता शिंदे, शहर सचिव मंगल बरकडे,रुपाली आयंची आधी उपस्थित होते. या प्रकरणाची विस्तृत माहिती अशी की,
जिल्हा उपनिबंधक कार्यालयात 25 वर्षांपासून कार्यरत असलेला तो कर्मचारीच जिल्हा निबंधक कार्यालय चालवत असल्याच्या चर्चा तिथे येणाऱ्या प्रत्येक तक्रारदारा कडून नेहमीच कानावर पडतात. अल्ताफ शेख असे हे कार्यालय चालविणाऱ्या बाबूजीचे नाव आहे.
केडगाव येथील विशाल मारुती निमसे याने पोलीस दलात कार्यरत असलेल्या देविदास शेंडे यांच्याकडून 21 जानेवारी 2024 रोजी 7 टक्केदराने 5 लाख रुपये घेतले होते. 9 महिने शेंडे यांना दरमहा 35 हजार रुपये प्रमाणे व्याज दिले, उशीर झाल्यास विशाल निमसे या तक्रारदाराने 35 ते 50 हजार रुपये दिले. मात्र नंतर देविदास शेंडे याने विशाल निमसे यांना बळजबरी करून, दादागिरी करून केडगाव येथील त्यांचे 30 लाख रुपये किंमतीचे त्यांचे राहते घर, पोलीस दलात कार्यरत असलेल्या शेंडे याने स्वतःचा चुलत भाऊ संतोष शेंडे यांच्या नावावर खरेदी केले. या प्रकरणी विशाल निमसे यांच्या बँक खात्यावर फक्त 14 लाख 85 हजार रुपये जमा केले. उर्वरित रक्कम अद्याप पर्यंत दिली नाही. याबाबत विशाल निमसे यांची पत्नी वैशाली विशाल निमसे देविदास शेंडे यांना विचारायला गेली असता, तू कोण आहेस, मी तुला ओळखत नाही, मी पोलीस दलात असल्यामुळे तुमच्यावर गुन्हे दखल करील. याबाबत तक्रारदाराची पत्नी वैशाली निमसे हिने रिपब्लिकन सेनेकडे धाव घेतली. याविषयी 4 डिसेंबर 2025 रोजी रिपब्लिकन सेनेच्या महिला आघाडीच्या वतीने तक्रारदाराची पत्नी वैशाली निमसे हिच्या समवेत जिल्हा निबंधक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.याबाबत व्याजाने पैसे देणाऱ्या पोलीस दलात कार्यरत असलेल्या देविदास शेंडे (राहणार, केडगाव ) यांच्या घरी 12 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी सकाळी 10 वाजून 52 मिनिटांनी सुमारे दिडतास शेंडे यांच्या घराची तपासणी केली, त्या ठिकाणी चहापाण्याची मेजवानी केली असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. याबाबत वैशाली निमसे हिने 30 डिसेंबर 2025 रोजी शेंडे यांच्या घराच्या तपासणीत काय आढळून आले, कोणकोणते अधिकारी त्या तपासणीत होते त्यांच्या नावाचा तपशील माहिती अधिकाराने मागविला, एक महिण्याने वैशाली निमसे यांना बोलावून हे माहीतचा तपशील दाखवत पत्रक प्रमुख शेख यांनी हे बरोबर आहे असे म्हणत यावर सही करा व हे प्रकरण मिटवून टाका असे म्हणाले,याबाबत दिलेली माहिती खोटी असल्याचे वैशाली निमसे यांच्या लक्षात आले. कारण देविदास शेंडे यांनी निमसे यांचे घर विकून राहिलेली रक्कम निमसे यांना परत दिलेली नसतांना यावर सही करून प्रकरण मिटवून टाका, असे बोलणे म्हणजे पत्रक प्रमुख शेख यांनी शेंडे यांची पाठराखण केल्यासारखे आहे. याप्रकरणी वैशाली निमसे यांनी 20 जानेवारी 2026 रोजी तक्रार दाखल केली, तक्रारीत आमच्या कुटूंबास न्याय न मिळाल्यास व देविदास शेंडे यांच्यावर कारवाई न सहकार आयुक्त पुणे, सहकार मंत्रालय या ठिकाणी उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत रिपब्लिकन सेनेने
जिल्हा उपनिबंधक यांना निवेदन दिले, सावकारी व्याज भरून बेघर झालेल्या पीडित निमसे कुटूंबाला न्याय मिळावा अशी भूमिका मांडली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे