जिल्हाधिकारी यांना जड वाहतूक शहरात बंद करण्याचे निवेदन. पुलाचे काम सुरू झाल्यापासून जे जे अपघात झाले त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळण्याची मागणी – स्वप्नील शिंदे

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर पुणे रोड वरील मार्केटयार्ड रोड कोठी रस्त्यावरील जड वाहतूक त्वरित बंद करण्याच्या मागणीसाठी कोठी परिसरातील नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शिंदे, राजू देठे, नयन अल्हाट, सिरील जाधव, सुनील डाके, अशोक गायकवाड, किशोर पाटोळे, भूषण चौधरी, सचिन भिंगारदिवे, आकाश साळवे आदीसह कोठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्टेशन रोड कोठी मार्केट यार्ड रोड रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात पायी चालणारे टू व्हीलर, थ्री व्हीलर व फोर व्हीलर च्या गाड्या मोठ्या प्रमाणात ये-जा करत असते व शहरात जड वाहतुकीला बंदी असून देखील दिवसाढवळ्या शहरात जड वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू आहे. कोठी परिसरात दररोज अपघात होत असून 5 मार्च रोजी एका तरुणाचा अपघात झाला. त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले त्या युवकाचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. सदरच्या रस्त्यावर दुरुस्ती करण्याचे काम चालू असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खडी टाकलेली असून ती एका बाजूने आलेली आहेत व येथील रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. व पुलाचे काम देखील चालू असून त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचे बोर्ड लावलेले नाहीत अथवा सदर कामाचे कर्मचारीदेखील त्या ठिकाणी लक्ष देत नसून या परिसरात मोठ्या प्रमाणात अपघात होत असून. अनेक नागरिकाचे जीव या रस्त्यावर जात असून. यापुढे कोणतेही अपघात होऊ नये प्राण जाऊ नये तसेच कोठी परिसरात आवश्यक त्या ठिकाणी स्पीडब्रेकर टाकण्यात यावे. त्याच प्रमाणे पुलाचे काम सुरू झाल्यापासून जे जे अपघात झाले. त्याच्या सर्व कुटुंबियांना शासकीय स्तरावर सर्व प्रकारची आर्थिक मदत द्यावी व शहरात येणारी जड वाहतूक बंद करण्यात यावी अशी मागणी कोठी परिसरातील नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे. जड वाहतूक बंद करण्यात आली नाही तर नागरिकांच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.