सामाजिक
नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे मित्र मंडळाच्या वतीने 9 एप्रिल रोजी प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या भव्य भिमगीतांच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी अहिल्यानगर शहरात ठिकठिकाणी भिमगीत गायन कार्यक्रमाचे फलक



गुरुवार 9 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा मार्केटयार्ड येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी अहिल्यानगर शहरात सुरु असून शहरात ठिकठिकाणी कार्यक्रमाचे फलक लावण्यात येत आहेत. या कार्यक्रमाला फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील विविध संघटना, समस्त समाज बांधव व बहुजन समाजातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे यांनी केले आहे.