निधन

ऍड. संदीप दादासाहेब पाखरे यांना पितृशोक सेवानिवृत्त मुख्याध्यापक दादासाहेब हरिभाऊ पाखरे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 5 एप्रिल : फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कायदेशीर सल्लागार ऍड.संदीप दादासाहेब पाखरे यांचे वडील नीलक्रांती चौकातील फुले, शाहू,आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक सेवानिवृत्त मुख्याध्यापक दादासाहेब हरिभाऊ पाखरे(वय.78 )यांचे आज दि. 5 एप्रिल हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सून नातेवाईक त्याचप्रमाणे फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा व मित्रपरिवार परिवार असा मोठा परिवार आहे.
अत्यंत शांत स्वभावाने ते निलक्रांती चौक व नातेवाईकांमध्ये तसेच फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये परिचित होते. त्यांच्या अंत्ययात्रा त्यांच्या नील क्रांती चौकातील राहत्या घरातून निघणार असून त्यांचा अंत्यविधी नालेगाव येथील अमरधाम येथे आज दिनांक 5 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता होणार आहे.
कालकथित दादासाहेब पाखरे गुरुजींना समस्त आंबेडकर चळवळीच्या वतीने, नीलक्रांती चौक मित्र मंडळाच्या वतीने देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने भावपूर्ण आदरांजली 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे