निधन

फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सोन्याबापू गुलाब सूर्यवंशी यांचे निधन

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर :दि. 5 एप्रिल : फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील नगर तालुक्यातील वाकोडी फाटा येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोन्याबापू गुलाब सूर्यवंशी (वय. 50) यांचे काल दि. 4 एप्रिल रोजी शहरातील नामांकित हॉस्पिटल मध्ये उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई, भाऊ, भावजया, नातेवाईक, कार्यकर्ते असा मोठा परिवार आहे. त्यांच्या स्पष्ट स्वभावामुळे ते आंबेडकरी चळवळीत अहिल्यानगर शहरासह, नगर तालुक्यात परिचीत होते. त्यांच्या अकाली निधनाने नातेवाईक, कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा अंत्यविधी आज दि. 5 एप्रिल 2026 रोजी नालेगाव येथील अमरधाम येथे दुपारी 12 वाजता होणार आहे.
फुले, शाहू, आंबेडकरी चळवळ व देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे