सामाजिक

श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरू; कॉम्रेड प्रवीण सोनवणेंचा प्रशासनावर तीव्र संताप!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : नेवासा / शिंगणापूर : श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्ट, शिंगणापूर येथील नियमित कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध न्याय्य मागण्यांसाठी सोमवार, दिनांक ३० मार्च २०२६ पासून शांततापूर्ण व कायदेशीर मार्गाने उपोषण आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात पुकारण्यात आलेल्या या आंदोलनाला आता कामगार संघटनांचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत आहे.
या आंदोलनावर बोलताना प्रसिद्ध कामगार नेते कॉम्रेड प्रवीण सोनवणे यांनी देवस्थान प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ते म्हणाले:
“अशा पद्धतीने कामगारांना सात-सात महिने पगार न देणे हे अत्यंत संतापजनक आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या हातामध्ये भरपूर पैसा आहे, त्यांच्या चुली व्यवस्थित चालू आहेत, म्हणून त्यांना या गरीब कामगारांच्या वेतनाची किंमत कळत नाही. कामगारांच्या हक्काची पायमल्ली आम्ही सहन करणार नाही.”
कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
१) थकबाकीचे वेतन: मागील थकित असलेले सर्व वेतन तत्काळ अदा करण्यात यावे.
२) सेवासुरक्षा: कर्मचाऱ्यांच्या सेवासुरक्षेची हमी देऊन कामगार हक्कांचे पूर्ण संरक्षण व्हावे.
३) कायमस्वरूपी सेवा: सर्व कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्यात यावे.
४) अन्यायकारक निर्णय: प्रशासनाने घेतलेले सर्व अन्यायकारक निर्णय तातडीने मागे घ्यावेत.
५) स्पष्ट भूमिका: या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाने आपली स्पष्ट आणि न्याय्य भूमिका मांडावी.
कर्मचाऱ्यांनी आरोप केला आहे की, ते सुशिक्षित बेरोजगार असून त्यांच्या रोजगारासंबंधी प्रचंड असुरक्षितता निर्माण झाली आहे. प्रशासनाने दीर्घकाळ त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच अखेर त्यांना उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी परिसरातील ज्येष्ठ कार्यकर्ते व सामाजिक संघटनांना उपस्थित राहण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे