सामाजिक

पोलीस प्रशासनाने सीडी वर सक्तीतीची कारवाई करू नये, दोन ते तीन दिवसात सीडी सोडण्यात यावेत : नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे सकल आंबेडकरी समाजाने घेतली जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे यांची भेट पोलीस प्रशासन योग्य ते सहकार्य करेल पोलीस अधीक्षकांचे आश्वासन

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 22 मार्च : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जवळ येऊन ठेपलेली आहे. याच पार्श्वभूमीवर मिरवणुकीच्या परवानग्या, सीडी बाबतच्या परवानग्या, तसेच विविध प्रश्नाच्या संदर्भामध्ये अहिल्यानगर शहरातील सकल आंबेडकरी समाजाने आज जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेतली. यावेळी बोलताना नगरसेवक तथा स्थायी समितीचे सदस्य सुरेशभाऊ बनसोडे म्हणाले पूर्वी ज्या पद्धतीने सीडीवर कारवाया व्हायच्या त्या पद्धतीने याही वर्षी साधारणतः कारवाई करून दोन ते तीन दोन ते तीन दिवसांमध्ये सीडी कसा सोडवण्यात येईल याबाबत पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे.यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्व गोरगरीब समाज कोणतीही वर्गणी न मागता ही जयंती साजरी करत असतो. आंबेडकरी समाज पोलीस प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करेल पोलीस प्रशासनाने देखील सीडींवर सक्तीची कारवाई न करता काही अटी शर्ती शिथिल करून कारवाई करावी. अशी विनंती त्यांनी पोलीस प्रशासनाला केली. यावेळी जिल्हा पोलीस प्रशासन योग्य ते सहकार्य करेल असे आश्वासन पोलीस अधीक्षक घार्गे यांनी दिले.सदर बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपअधिक्षक सुनील टिपरसे तसेच ज्येष्ठ नेते अशोकराव गायकवाड प्रा. जयंतराव गायकवाड, गौतमभाऊ म्हस्के, माजी नगरसेवक अजय साळवे, श्रीमती शोभा गाडे, प्राध्यापक विलास साठे,सुनील क्षेत्रे,आकाश डागवाले, महेश भोसले, निखिल शेलार,अमित काळे,अंकुश मोहिते, सिद्धार्थ आढाव, सुमेध गायकवाड, किरण दाभाडे, सुनील साळवे, विवेक भिंगारदिवे, विशाल भिंगारदिवे, कौशल गायकवाड, सौरव पंचमुख, सनी माघाडे, विनोद गायकवाड, जय कदम,अक्षय गायकवाड, पप्पू वाघमारे, करण भिंगारदिवे, संजय साळवे, आकाश शिंदे, निलेश शिंदे, रोहन रोकडे, आकाश भिंगारदिवे,सचिन धिवर, महेश पाखरे, अजय पाखरे,विकी पाटोळे, अजय आंग्रे, कृपाल भिंगारदिवे, सूर्यकांत पाखरे, सचिन जमधडे, सुशील कदम, संदीप शिंदे, आकाश गायकवाड, मुन्ना भिंगारदिवे, करण साळवे, गणेश गायकवाड, विशाल गायकवाड, अनिकेत गायकवाड, राहुल साळवे, प्रबुद्ध कांबळे, अजिंक्य भिंगारदिवे, भाऊ भिंगारदिवे, अक्षय भिंगारदिवे, सुजित घंगाळे, ऋषी विधाते, येशूदास वाघमारे , वृषाल साळवे, गौरव साळवे, सुशांत शिरसाठ, आदी कार्यकर्ते शहरातील सकल आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कॅप्टन अशोक खरात प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जलद गतीने तपासाची चक्रे फिरवली याबाबत सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक घार्गे यांचा शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे