देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर: दि. 25 ऑगस्ट: पटवर्धन चौकातील घोडेपीर दर्गा पाडण्याच्या घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या तपासात जेसीबी मालक अरुण खरात यांचे नाव समोर येताच शहरात खळबळ माजली आहे. यावेळी सुरेश बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले, यावेळी बोलतांना बनसोडे म्हणाले, जिहादी लोकांच्या सांगण्यावरून बौद्ध समाजाचे जेसीबी मालक अरुण खरात यांना आरोपी केले आहे.
हे केवळ वाहनाचे मालक असून प्रत्यक्ष घटना त्यांच्या चालकाने परस्पर घडवली, असा ठोस दावा आंबेडकरी समाजाने यावेळी केला आहे.
आंबेडकरी समाजाच्या निवेदनात म्हटलं आहे की, अरुण खरात यांचा या घटनेशी कोणताही संबंध नसताना, ते बौद्ध समाजाचे असल्याने त्यांना जाणीवपूर्वक यात गोवले जात आहे. “गेल्या अनेक वर्षांपासून जेसीबी त्यांच्या चालकाच्या ताब्यात आहे, मग एका चुकीसाठी मालकावर अन्याय का?” असा थेट सवाल करण्यात आला आहे.
समाजाने जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात अरुण खरात यांचे नाव तातडीने या प्रकरणातून वगळावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. सदर निवेदनावर सुरेश बनसोडे, संजय जगताप, प्रा. भीमराव पगारे, सुमेध गायकवाड, सिद्धार्थ आढाव, मयूर बांगरे, अंकुश मोहिते, सुनील भिंगारदिवे,या संपूर्ण घडामोडीमुळे शहरातील वातावरण अधिक तणावपूर्ण बनले असून, पोलिस प्रशासनावर सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्याचा दबाव वाढला आहे.
हा प्रकार पुढे कोणते वळण घेणार, याकडे संपूर्ण अहिल्यानगरचे लक्ष लागले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा