सामाजिक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीत, मिरवणुकीत आमदार संग्राम जगताप, सुरेश बनसोडे यांचाच बोलबाला

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 2 ऑगस्ट : ” फकीरा “, “चित्रा”,” वारणेचा वाघ ” यासारख्या प्रसिद्ध कादंबऱ्या लिहिणारे, सामाजिक चळवळीत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन डॉ. आंबेडकर यांना गुरु मानत ” जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव ” हे ब्रीदवाक्य घराघरात पोहचविणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. सकाळी सिद्धार्थनगर येथील साठे चौकात आमदार संग्राम जगताप यांनी महापालिकेचे आयुक्त डांगे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे व उपस्थित कार्यकर्त्यांसमवेत अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. शहरात दिवसभर चाललेल्या आभिवादन कार्यक्रमात व सायंकाळी निघालेल्या मिरवणुकीत आमदार संग्राम भैय्या जगताप व राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाअध्यक्ष सुरेश बनसोडे यांच्याच चर्चा समाजातील तरुणाई मध्ये होत होत्या,एकंदरीतच आमदार जगताप व बनसोडे यांच्या बोलबाल्याचा चांगला परिणाम येणाऱ्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत तरुणाईच्या माध्यमातून होणार असल्याचे चित्र आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे