राजकिय

आमदार अमितजी गोरखे यांना कॅबिनेटमध्ये मंत्रिपद मिळावे:भगवान मिसाळ महाराष्ट्रातील संपूर्ण दलित समाजाच्या भावना

अहिल्यानगर दि. 1 डिसेंबर (प्रतिनिधी ) विधान परिषदचे आमदार भाजपचे नेते देवेंद्र फडवणीस यांच्या अत्यंत जवळचे सहकारी उच्च विद्या विभूषित व मातंग समाजाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार अमित गोरखे यांना मंत्रिमंडळ घ्या अशी महाराष्ट्रातील दलित मागणी समाजाची आहे
आमदार अमित गोरखे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती झाल्यावर त्यांनी बहुजन संवाद यात्रा मंत्रिपदापर्यंत पोहचणार,संविधानाबाबत नॅरेटिव्ह बदलल्याने आमदार गोरखे यांना लाभ होण्याची शक्यता
मातंग समाजाचे युवानेते म्हणून राज्यात काढलेल्या ‘बहुजन संवाद यात्रे’चा लाभ भाजपचे आमदार अमित गोरखे यांना होणार व त्यांची वर्णी राज्याच्या नवनिर्वाचित मंत्रिमंडळात लागणार .
याबाबत भाजपसह राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
लोकसभा निवडणुकीच्याकाळात ‘संविधान बदलणार’ या ‘नॅरेटिव्ह’चा फटका भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात बसला होता. राज्याचे भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर योजना आखली. त्यानुसार विधान परिषदेवर आमदार म्हणून अमित गोरखे या मातंग समाजातील तरुण व उच्च शिक्षित नेतृत्वाची वर्णी लागली. फडणवीस यांनी दिलेल्या संधीचे सोने करत गोरखे यांनी राज्यभर ३० जिल्ह्यातील ७८ विधानसभा मतदारसंघातून ३१ हजार किलोमीटर बहुजन संवाद यात्रा काढली. त्यामुळे बहुतांश प्रमाणात अनुसूचित जाती या प्रवर्गात ‘संविधान बदला’चे नॅरेटिव्ह खोडण्यात आमदार गोरखे यांना यश आले, अशी भाजप वर्तुळात चर्चा आहे.
भाजपमध्ये मातंग समाजाचे तीन आमदार मंत्री पदाच्या इच्छुक आहेत. त्यापैकी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून सुनील कांबळे, नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघातून जितेश अंतापूरकर निवडून आले आहेत. तर; आमदार गोरखे यांची विधान परिषदेवर नियुक्ती झालेली आहे.
आमदार दिलीप कांबळे यांना निवडणुकीपूर्वी अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्षपद दिलेले आहे. तर; आमदार अंतापूरकर हे नुकतेच दोन महिन्यांपूर्वी भाजपमध्ये आलेले आहेत. तर; गोरखे यांच्या राज्यव्यापी दौऱ्यामुळे समाज घटकात पक्षाचा माणूस म्हणून त्यांचे नाव पोहचले आहे. दलित मातंग समाज बांधवांना जागृत करून भाजपा व माहयुती सरकारने मातंग समाजाचे हिताचे निर्णय कसे घेतले आहेत. हे पटवून देत मातंग समाजाच्या अस्मितेचा आध क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुणे येथे राष्ट्रीय समारक साठी देवेंद्र फडणवीस व माहायुती सरकारने सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी देऊन ते काम सुरू केले. तसेच मुंबईतील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक साठी याच सुमारे दीडशे कोटी रुपयाचा निधी देऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली. मातंग समाजाच्या अस्मितेचा असलेल्या प्रश्न मातंग समाजातील शिक्षित समाज घडवा म्हणून अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरची केलेली सुरुवात. तसेच आरक्षणातील अ. ब .क. ड. वर्गवारी चा घेतलेला निर्णय इत्यादी महत्त्वाची भाजपा माहायुती सरकाराने केलेली कामे समाज बांधवांच्या पर्यंत पोहोचल्यामुळे दलित विशषता मातंग समाजाच्या कडून भाजपा माहायुतीला भरभरून मतदान झाल्याचे दिसत आहे. आमदार अमित गोरखे यांनी त्यांच्या अभ्यासपूर्व भाषेतून सर्व समाज बांधवांना समजावून दिल्यामुळे निगेटिव्ह नेरीटिव्हचा परदा फाश या युवा आमदाराने केल्यामुळे आमदार अमित गोरखे यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री पदी अशी सर्वच दलित समाज बांधवांची मनोमन इच्छा आहे. सर्वांना सोबत घेणारा व अभ्यासू फडणवीस साहेबांच्या जवळचा सहकारी म्हणून आमदार गोरखे यांना महाराष्ट्राच्या मंत्री मंडळ स्थान दिल्यास. दलित व मातंग समाजाची अनेक प्रश्न मार्गी लागतील त्यामुळे अमित गोरखे. यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यातून होत आहे. दलित चळवळीतील पदाधिकारी. कार्यकर्ते. समाज बांधवांनी भाजपा वरिष्ठाकडे केली आहे संपूर्ण महाराष्ट्रातील समाजातील ही मागणी भाजपाचे वरिष्ठ निश्चित पूर्ण करतील . अशी अपेक्षा अहिल्यानगर जिल्ह्यातील मातंग समाज तरुणांनी व्यक्त केली.
दरम्यान; मातंग समाजातील सकल मातंग समाज महाराष्ट्र शिष्टमंडळासह राज्यातील समाजाच्या विविध शिष्टमंडळांनी पक्षाने नेते, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आमदार गोरखे यांची मंत्रिपदी वर्णी लागावी अशी शिफारस केली आहे. त्यामुळे आता आगामी कॅबिनेट मंत्रिमंडळात आमदार गोरखे यांची वर्णी लागणार आहे . अहिल्यानगर मधून दलित मातंग समाज ,विवेक उर्फ भगवान मिसाळ. भाजपा अनु.जाती जिल्हा उपाध्यक्ष. भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांत काळुंखे. पत्रकार भारत पवार,नगरसेवक विजय वडागळे, चेअरमन भगवानराव गोरखे,सुनील उमाप,पंडित सर. अध्यक्ष पै.अंकुश मोहिते, मेंबर प्रकाश घोरपडे, प्रकाश वावरे,सुनील सकट, सत्यवान नवगिरे, गुलाबराव गाडे,रामजी वडागळे, अशोक ससाने, सचिन भारस्कर, भगवान साठे, दीपक साळवे, बाबासाहेब पवळे, विष्णू मिसाळ, मधुकर मोहिते, प्रदीप मोहिते,किरण भालेराव, विजय मेहिते, जनार्दन भारस्कर,अमोल दिनकर,समस्त दलित मातंग समाज भावना आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे