सामाजिक
बुद्ध विहारात शिवजयंती उत्साहात साजरी

अहमदनगर दि. 20 फेब्रुवारी (प्रतिनिधी ) नगर तालुक्यातील दरेवाडी गावातील बुद्ध विहारात शिवजयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व विश्व्रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पाहार व फुले वाहून आभिवादन करण्यात आले. यावेळी दरेवाडी गावाच्या सरपंच स्वाती बेरड, उपसरपंच अनिल करांडे, ग्रामसेवक संपत दातीर,ग्रामपंचायत सदस्या आकांक्षा भिंगारदिवे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महिला जिल्हा अध्यक्ष गौतमी भिंगारदिवे, मिरा देठे कंथाबाई भिंगारदिवे,नंदा जगताप, अश्विनी भिंगारदिवे, कुसुमताई भिंगारदिवे, सामाजिक कार्यकर्ते तथा देशस्तंभ न्यूज नेटवर्क चे उपसंपादक सुरेश भिंगारदिवे यशवंत पाटोळे, वर्षा भिंगारदिवे, नितीन बेरड आदी उपस्थित होते.