भिंगार दि. 18 फेब्रुवारी (प्रतिनिधी )
दिनांक 17/02/2023 रोजी कॅम्प् पोलीस स्टेशनचे सपोनि योगेश राजगुरु यांना गोपनिय माहिती मिळाली की, भिंगार शहरातील पाटील गल्लीतील हरबा वाडयात काही इसम हे एकत्र बसुन पैशांवर तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळत आहेत आता गेल्यास मिळुन येतील अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने सपोनि राजगुरु यांनी तात्काळ कॅम्प् पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदारांना बातमीतील नमुद ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे आदेशीत केल्याने पथकातील अंमलदार यांनी बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री केली असता तेथे पाच इसम हे गोलाकार एकत्र बसुन जुगार खेळत असल्याचे तपास पथकाच्या निदर्शनास आल्यानंतर पथकाने छापा टाकुन पाच इसमांना जागीच पकडुन त्यास त्यांचे नाव गाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे 1. प्रवीण सुनिल पॅडुलकर वय-25 वर्षे पाटील गल्ली भिंगार अहमदनगर 2. आकाश अरुण थोरात वय-25 वर्षे रा पाटील गल्ली भिंगार अहमदनगर 3. तेजस रघुनथ पाडळे वय-26 वर्षे रा. भिमनगर भिंगार अहमदनगर 4. शिवा राजु सदलापुरकर वय-27 वर्षे रा मुळेगल्ली भिंगार अहमदनगर 5. अविनाश कुमार व-हाडे वय-45 रा पाटीलगल्ली भिंगार अहमदनगर असे असल्याचे सांगीतले. त्यांच्याकडुन गुन्हयातील एकुन 63600/-रु किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन वरील पाच इसमांवर गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधिक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग, अहमदनगर, यांचे मार्गदर्शनाखाली योगेश राजगुरु सहा. पोलीस निरीक्षक, पोसई किरण साळुंके व तपास पथकातील पोलीस अंमलदार संदिप घोडके,दिपक शिंदे,समीर शेख,अमोल आव्हाड, .संदिप थोरात,कैलास शिरसाठ यांच्या पथकाने केली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा