स्वछतेमुळे जिल्हा रुग्णालयाचे रूप आता बदलतंय

अहमदनगर दि.18 ऑक्टोबर (प्रतिनिधी ) सिव्हिल हॉस्पिटल अर्थात जिल्हा शासकीय रुग्णालय हा शब्द जरी कानावर आला तरी सर्व सामान्य माणसाच्या मनात धस्स झाल्याशिवाय राहत नाही. पूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रवेश करायचा म्हटलं कि तेथील घाण, अस्वछता, वास हे सगळं चित्र डोळ्यासमोर यायचं! पण आता सिव्हील हॉस्पिटल स्वछता व साफ सफाईमुळे चांगल्या पद्धतीने चर्चेत येत आहे.
प्रत्येक वार्ड चांगल्या पद्धतीने दररोज स्वच्छ केला जात आहे. येथील टॉयलेट, बाथरूम, तसेच भिंती जंतूनाशक औषधे वापरून दररोज स्वच्छ केल्या जात आहेत. तसेच ज्या ठिकाणी तंबाखू व गुटखा, मावा यांच्यामुळे भिंती खराब झाल्या आहेत. त्या ठिकाणी त्या साफ करून त्यावर रंग मारला जात आहे.आठवड्यात एक दिवस पूर्ण हॉस्पिटल धुवून घेतले जाते.
एकंदरीच या सगळ्या सकारात्मक बदलामुळे येथे येणाऱ्या रुग्णामध्ये व नागरिकांमध्ये “सिव्हिल हॉस्पिटल आता पूर्वी सारखे राहिले नाही ” अशा भावना व्यक्त होणे स्वभाविकच आहे.यामध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार यांचा अत्यंत महत्वाचा आहे.आणि म्हणूनच जिल्हा रुग्णालयाचे रूप आता बदलतंय!