गुन्हेगारी

प्रवासी म्हणून टेम्पोत बसून चालकाला लुटणाऱ्या गुन्ह्यातील आरोपी नेवासा पोलीसांनी केले अवघ्या तासात जेरबंद !

नेवासा दि.१७(प्रतिनिधी )- प्रवासी म्हणून आयशर टेम्पोमध्ये नेवासा फाटा येथून बसलेल्या चार चोरट्यांनी टेम्पो चालकालाच मारहाण करुन पैसे लुटल्याची खळबळजनक घटना रविवार (दि.१५) रोजी राञी आठ वाजेच्या सुमारास खडका फाटा येथील हॉटेल औदुंबर समोर घडली या घटनेतील जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांना पकडण्यासाठी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शिवाजीराव डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस ठाण्याचे पोसई संदीप ढाकणे,पोलीस नाईक अशोक लिपणे,किरण गायकवाड, संदीप बर्डे,पो.कॉ.सुमित करंजकर पो.कॉ.संदिप ढाकणे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आयशर टेम्पो चालकाने दिलेल्या माहीतीवरुन नेवासा पोलीसांनी चोरट्याचा शोध घेत जबरी चोरीतील चारही आरोपी एका तासाच्या आत गजाआड करण्यात यश मिळविल्यामुळे पोलीसांच्या कामगिरीबाबत जनतेतून समाधानाबरोबरच कौतुकही केले जात आहे.
या घटनेबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की,रविवारी दुपारीतीन वाजेच्या दरम्यान छञपती संभाजीनगर येथून आयशर टेम्पो हा फरशी घेवून शेवगांव तालुक्यातील आव्हाणे येथे खाली करुन पुन्हा छञपती संभाजीनगरकडे नेवासा फाटा मार्गे जात असतांना नेवासा फाटा येथे टेम्पो चालक परवेज फकरु शेख याला चार जणांनी हात केल्यामुळे चालकाने टेम्पो थांबून कुठे जायचे अशी विचारणा केली असता पंढरपूरला जायचे म्हणून टेम्पोत बसलेल्या चार जणांनी चालकाला दमबाजी करत त्याच्या खिशात हात घालून पैसे काढण्याचे कृत्य आरोपी शिवाजी बंडु विटकर रा.नेवासा फाटा,दत्तात्रय ज्ञानेश्वर भुजंग रा.नेवासा फाटा,अमोल पुंजाराम मांजरे रा.झोपडपट्टी नेवासा फाटा,गणेश कचरु भुजंग रा.मुकिंदपुर यांनी केल्यामुळे खडका फाटा येथील हॉटेल औदुंबर जवळ चालकाने टेम्पो थांबविला असता या चालकालाच चोरट्यांनी गाडीतील पहाण्याने मारहाण करुन त्याच्या खिशातील १० हजार ६०० रुपये आधारकार्ड घेवून चोरटे पुन्हा अंधाराचा फायदा घेत नेवासा फाट्याकडे पळून गेले असता वाहन चालकाने पोलीस डायल नंबर ११२ ला माहीती दिली असता नेवासा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व पोलीसांनी चारही आरोपी पकडून नेवासा पोलीस ठाण्यात आणले असता या टेम्पो चालकाला लुटण्याच्या आधीच सोमनाथ दिपक बजागे रा.पडळवाडी जि. कोल्हापुर याला सुध्दा नेवासा फाटा येथे मारहाण करुन वरील चौघा चोरट्यांनी या युवकाचा एक विवो कंपनीचा मोबाईल व खिशामधील ७०० रुपये काढून घेतले असल्यामुळे चोरटे ओळखल्याने नेवासा पोलीस ठाण्यात वरील चौघा चोरट्यांविरोधात नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करुन आरोपी गजाआड करण्यात नेवासा पोलीसांना यश आले.या घटनेचा पुढिल तपास पोसई संदिप ढाकणे करीत आहेत.

चौकट:
प्रवासी म्हणून आयशर टेम्पोत बसलेल्या चार चोरट्यांनी टेम्पो चालकाला लुटले पोलीसांनी चार चोरटे तासाभरात गजाआड करण्याठी पकडून आणले असता याच चोरट्यांनी एका जणाचा एक विवो कंपणीचा मोबाईल व ७०० रुपये काढून घेतल्यामुळे फिर्याद देण्यासाठी आलेल्या इसमाला हे चोरटे दिसल्यामुळे पोलीसांनी फिर्याद दाखल करुन घेत आरोपी गजाआड केले आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे