मारुती व्हॅनसह शितपेय चोरणारे आरोपीस तोफखाना पोलीसांनी केले 12 तासाच्या आतमध्ये मुद्देमालासह जेरंबद!

अहमदनगर दि. 18 ऑक्टोबर (प्रतिनिधी )तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं – 1519/2023 भा.दि.व कलम 379, प्रामणे दाखल गुन्हयातील फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, त्यांची मारुती व्हॅन नंबर एम एच 16 ए टी 1713 हीमध्ये शितपेय भरुन ते हॉटेलमध्ये पोहच करत असताना अज्ञात चोरटयाने गाडी मालासह पळवुन नेली आहे.
वगैरे मजकुरचे फिर्यादी वरुन फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल केला प्राप्त माहीतीच्या आधारे पोलीसांनी यातील आरोपी चंद्रकांत नानाभाऊ आजबे वय 39 वर्षे रा. आदर्शनगर एम आय डी सी याचा शोध घेवुन 75,000/- रु किंमतीचे मारुती व्हॅन व शितपेय हस्तगत केली आहेत.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी सो, श्री अनिल कातकाडें यांचे मार्गदर्शनाखालील पो.नि.श्री मधुकर साळवे,पो.उपनिरी सचिन रणशेवरे, पोहेकॉ दत्तात्रय जपे, पोहेकॉ सुनिल शिरसाट, पोना संदिप धामणे, अविनाश वाकचौरे पो ना वसीम पठाण, पो.ना. अहमद इनामदार, पोकॉ शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, सतीश भवर, संदिप गि-हे, पोकॉ सचिन जगताप, पोकॉ सतिष त्रिभुवन, ,पोकॉ बाळासाहेब भापसे, , गौतम सातपुते, पोकॉ राहुल गुंडू सायबर पोलीस स्टेशन यांनी केली असुन पुढील तपास पोहेकॉ अनिल गिरीगोसावी हे करत आहेत.