विविध सामाजिक संघटनेच्या वतीने तोफखाना पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार

अहमदनगर दि.८ऑगस्ट(प्रतिनिधी):-अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याचा हद्दीमध्ये घडलेले खून,दरोडे,चोऱ्या,हाणामाऱ्या या घटनेमधील गुन्हेगारांना तात्काळ जेरबंद केल्याबद्दल कर्तव्यदक्ष असे तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सिंघम अधिकारी श्री.मधुकर साळवे,पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके व तोफखाना पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचा सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने मिळून तोफखाना पोलीस ठाण्यात सत्कार करण्यात आला.तसेच जो अधिकारी प्रमाणिकपणे काम करत आहे अशा अधिकाऱ्यांच्या पाठीमागे सर्व संघटना खंबीरपणे उभा राहणार आहे असे सर्व संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले. यावेळी नितीन खंडागळे संस्थापक अध्यक्ष पोलीस बॉईज संघटना,प्रतीक बारसे जिल्हाअध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,सुशांत मस्के शहर जिल्हाध्यक्ष (RPI गवई गट),अफसर शेख संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मानव विकास परिषद भारत तसेच राष्ट्रीय संपर्कप्रमुख स्वतंत्र संपादक पत्रकार संघ,संतोष पाडळे तसेच अनेक सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.