सामाजिक

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान काँग्रेस खपवून घेणार नाही : किरण काळे ; षडयंत्राची शक्यता, मास्टरमाईंडचा पोलिसांनी शोध घ्यावा, काँग्रेसची मागणी

अहमदनगर दि. ७ ऑगस्ट (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करण्यात आल्यानंतर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काँग्रेसच्या वतीने यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान हा शिवप्रेमींच्या भावना दुखावणारा आहे. काँग्रेस तो कदापी खपवून घेणार नाही. महापुरुषांबद्दल सातत्याने अवमानजनक वक्तव्य केली जात आहेत. महाराष्ट्रात नगर शहर अशा घटनांच केंद्र बनल आहे. यामागे मोठं षडयंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सातत्याने अशा प्रकारची वक्तव्य ही नगर शहरातूनच का केली जात आहेत ? पोलिसांनी या मागील खरा मास्टरमाईंड शोधण्याची गरज आहे, असे काळेंनी म्हटले आहे.
अशी वक्तव्य करणारी वाचाळवीर लोक, त्यांची पार्श्वभूमी याचा बारकाईने तपास करण्याची गरज आहे. तसेच या वाचाळवीरांचे कॉल डिटेल्स, एसडीआर रेकॉर्ड, सोशल मीडिया रेकॉर्ड, इंटरनेट कॉल्स काढून त्यांच्या संपर्कात कोण लोक आहेत आणि संपर्कात असणाऱ्या लोकांच्या संपर्कात कोणते राजकीय, संघटनांचे लोक आहेत काय ? तसेच धार्मिक भावना भडकवणारे काही समूह यांच्या संपर्कात आहेत काय ? याचा कसून तपास पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणांनी केला पाहिजे. पोलिसांनी शहरातील सातत्याने चिघळणाऱ्या व धार्मिक तेढ निर्माण होणाऱ्या वातावरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सखोल तपास केला तर मला विश्वास आहे की या षडयंत्रा मागे असणारे खरे मास्टरमाईंड जनतेसमोर नागडे होतील, असा विश्वास किरण काळे यांनी व्यक्त केला आहे.
काळे पुढे म्हणाले की, शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था, कोट्यवधी रुपयांचा खर्च करून देखील बोजवारा उडवलेली पाणी वितरण व्यवस्था, कचऱ्यांचे शहरात जागोजागी लागलेले ढीग, शहरातील एमआयडीसीची झालेली वाताहात, तरुणांमधील बेरोजगारी, बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचा ठप्प झालेला व्यापार, शहारत सुरू असणारे गॅंगवॉर, अवैध धंद्यांचा सुळसुळाट, हत्याकांडांची मालिका, खुनी हल्ले, बेकायदेशीर ताबा प्रकरणे, वाढलेली महागाई, गॅस, पेट्रोल, डिझेलची सामान्य माणसाला न परवडणारी दरवाढ अशा सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यातील खऱ्या भेडसवणाऱ्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याकरिता राजकीय पोळ्या भाजण्याकरिता समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नगर शहर अशा घटनांच अतिसंवेदनशील केंद्र झाल आहे. अशा काही घटना घडल्या की काही लोक नौटंकी करत त्या माध्यमातून चिथाणीखोर बेताल वक्तव्य करत असून यामुळे शहरातील वातावरण दूषित होत आहे. नागरिकांनीच याबाबत सतर्क राहत अशा प्रवृत्तींमुळे शहरातील वातावरण बिघडणार नाही यासाठीची जागरूकता दाखवावी, असे आवाहन काळेंनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे