चैन स्नॅचिंग गुन्ह्यातील सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड!

अहमदनगर दि.७ ऑगस्ट (प्रतिनिधी)चैन स्नॅचिंग गुन्ह्यातील सराईत आरोपीस गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिह्यातील फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/सोपान गोरे, सफौ/भाऊसाहेब काळे, पोहेकॉ/विजय वेठेकर, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाण, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले, संतोष लोढे, संदीप दरंदले, विशाल दळवी, गणेश भिंगारदे,पोकॉ/रोहित येमुल, आकाश काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब गुंजाळ, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, मपोना/भाग्यश्री भिटे, चापोहेकॉ/संभाजी कोतकर व चापोहेकॉ/अर्जुन बडे अशा पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक नेमुन कारवाई करणे बाबतचे सुचना दिल्याने. पथक श्रीरामपूर परिसरात फिरुन फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना पोनि/श्री. दिनेश आहेर गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, संगमनेर येथील महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र चोरी करणारा सलमानअली जाफरी रा.श्रीरामपूर याने त्यांचे साथीदारासह केला असुन ते दोघे थत्ते मैदान, श्रीरामपूर येथे येणार आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाली. प्राप्त माहिती पथकास कळवुन, पंचाना सोबत घेवुन, नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.
पथकाने तात्काळ बातमीतील थत्ते मैदान, श्रीरामपूर या ठिकाणी जावुन संशयीतांचा शोध घेताना दोन इसम मैदानात झाडा खाली बसलेले दिसले. पथक संशयीतांना ताब्यात घेण्याचे तयारी असताना पोलीस पथकाची चाहुल लागताच ते पळुन जावु लागले. पथकाने त्यांचा पाठलाग करुन एका संशयीतास ताब्यात घेतले व एक इसम पळुन गेला. ताब्यात घेतलेल्या इसमास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) सलमानअली सलीम जाफरी, वय 23, रा. इराणी गल्ली वॉर्ड नं.1, ता. श्रीरामपूर असे सांगितले. त्यांची पंचा समक्ष अंगझडती घेता त्याचे अंगझडतीमध्ये सोन्याचे दागिने मिळुन आले. सदर बाबत विचारपुस करता त्याने त्याच्या साथीदारासह जुन महिन्यात संगमनेर येथे महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरल्याची कबुली दिली. संशयीताने दिलेल्या कबुलीचे अनुषंगाने संगमनेर येथील गुन्हे अभिलेख पडताळणी करता संगमनेर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 445/2023 भादविक 392, 34 प्रमाणे चैन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल असले बाबत माहिती मिळाल्याने आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्यास पळुन गेलेला इसम व त्याचा साथीदार याचे बाबत विचारपुस करता त्याने पळुन गेलेल्या साथीदाराचे नाव 2) मम्मु ऊर्फ मंहम्मदअली अजीज इराणी, रा. लोणी काळाभोर, जिल्हा पुणे (फरार) असे असल्याचे सांगितले. त्याचा शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही.
ताब्यात घेतलेल्या आरोपी नामे सलमानअली सलीम जाफरी यास 60,000/- रुपये किंमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिन्यासह ताब्यात घेवुन संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
आरोपी सलमानअली जाफरी हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर व ओरीसा राज्यात जबरी चोरी, शासकिय कामकाजात अडथळा व चोरी असे गंभीर स्वरुपाचे एकुण 4 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे-
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. श्रीरामपूर शहर 217/2020 भादविक 392, 34
2. सोरो, राज्य ओरीसा 243/2020 भादविक 379, 411, 34
3. सोरो, राज्य ओरीसा 244/2020 भादविक 294, 353, 332, 186, 427, 504, 506
4. वांळुज एमआयडीसी, जिल्हा छत्रपती संभाजीनगर 918/2022 भादविक 392, 34
सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व डॉ. श्री. बसवराज शिवपुजे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखालील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.