कौतुकास्पद
हरवलेली माता “मानवसेवा” च्या उपचारानंतर पोहचली कुटुंबात


त्याचबरोबर निराधारांचे पत्ते शोधण्यासाठी देशात कोणत्याही भागात त्यांच्या हरवलेल्या कुटुंबांसोबत त्यांना पुन्हा एकत्र करणे, शहर, खेडी, कुटुंबे, पोलिस कर्मचारी, रेल्वे अधिकारी आणि लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्याचे कार्य श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ मानवसेवा प्रकल्पाच्या माध्यमातून करीत आहे.
समुपदेशन आणि उपचारतून सावरल्यावर या मातेने आपल्या कुटुंबाची व गावाची माहिती दिली. संस्थचे स्वयंसेवक अंबादास गुंजाळ, सुशांत गायकवाड, राहुल साबळे, सोमनाथ बर्डे, सिराज शेख संस्थेच्या अध्यक्षा पुजा मुठे यांनी कुटुंबाची खात्री करुन शिरुर पोलीसांच्या मदतीने या मातेला दि. ०२ जानेवारी २०२४ रोजी कुटुंबात पोहचवून पुनर्वसन केले. तब्बल पाच वर्षांनी ही माता कुटुंबात पोहचताच कुटुंबीयांच्या चेह-यावर आनंद पाहावयास मिळाला.