अहमदनगर दि. 11 जानेवारी (प्रतिनिधी )
बेलवंडी पोलीस स्टेशन कडील पोलीस हवालदार पदी पदोन्नती झालेल्या अंमलदारांचा पदोन्नती कार्यक्रम श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे मानवी सेवा प्रकल्प अरणगाव येथे साजरा करण्यात आला.
यावेळी
माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या कल्पनेतून बेलवंडी पोलीस स्टेशन कडील पदोन्नती झालेले अंमलदार यांना मानव तस्करी विरोधी दिनाचे औचित्य साधून मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला व मानव तस्करीतून सुटका झालेल्या पिडितांच्या हस्ते पोहेका नंदू पठारे, पोहेका भाऊसाहेब यमगर, मपोहेक काळे, मपोहेका गायकवाड, मपोहेका माने यांचा सत्कार करण्यात आला.
, तसेच मानव सेवा प्रकल्पातील पीडितांना स्नेहभोजन देऊन आपला पदोन्नतीचा कार्यक्रम साजरा करून आनंद द्विगुणित केला आहे.
सदर कार्यक्रमास पर्यवेक्षक दिनाधिकारी श्री जीवन IPS , श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ मानव सेवा केंद्राचे मार्गदर्शक श्री संजय शिंगवी श्री अंबादास गुंजाळ ,शिराज शेख, महेश पवार ,सोमनाथ बर्डे ,पूजा मोठे,सुशांत गायकवाड, राहुल साबळे, हजर होते.
यावेळी मान्य पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी बेलवंडी पोलीस स्टेशनचे ऑपरेशन मुस्कान मध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस उपनिरीक्षक गाजरे पोलीस उपनिरीक्षक चाटे पो हवा नंदू पठारे यमगर पोलीस हवालदार शिंदे पवार सतीश शिंदे दिवटे लेखनिक शिपनकर , हसन शेख जावेद शेख झुंजार त्यांनी वेठबिगारी बाबत केलेल्या कारवाईसाठी सन्मान केला.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा