पुणे – पुढील काही दिवस राज्य थंडीने गारठणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पश्चिमेतून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मात्र आजपासून पावसाचे प्रमाण एकदम कमी होऊन आणि थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर राज्यातील बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडे राहिल. त्यामुळे थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात ढगाळ हवामानासह किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. तसेच पहाटेच्या वेळी धुक्याची चादर पाहायला मिळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात सध्या अनेक ठिकाणी ढगाळ हवामान झाले असून, पहाटे कमालीचा गारठा जाणवत आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा