बुलढाणा (पत्रकार रोहित गांधी ):- बुलढाणा जिल्ह्यातील ता.मेहकर येथील तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक तहसील कार्यालयसमोर खालील मागण्यासाठी बेमुदत उपोषण करण्यात आले.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केले असून आदेशानंतर ही अधिकाऱ्यांनी ते हटविले नाही.
त्या अधिकारी व एमआयडीसी भुखंड हडप करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी. शहरातील बोगस मिटाई दुकानदारांवरती तत्काळ कार्यवाही करावी, अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात यावे. नगरपरिषद समोरील अतिक्रमण हटवुन झाडे लावण्याचे काम सुरू करावे.
येथील पोलिस वसाहतीचे बांधकाम तत्काळ सुरू करण्यात यावे. तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची जे जे एन्ड सन्स व नापतोल या दोन कंपन्यांकडून विटंबना केली असता, दोन्ही कंपन्या तात्काळ बंद करण्यात याव्यात.आदी मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर संदीप गवई, सुनिल वनारे,दुर्गादास आंभोरे, राधेशाम खरात, महादेव मोरे, हे तीन दिवस उपोषणास बसले असता यावेळी प्रशासनाने सर्व मागण्या मंजुर केल्या व भाई कैलास सुखधाने यांच्या व सर्व प्रशासन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपोषन कर्ते यांचे उपोषण सोडविण्यात आले.
यावेळी, तथागत ग्रुपचे मार्गदर्शक भाई कैलास सुखधाने, संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई, ॲड.देवकांत मेश्राम,सुनिल वनारे, दुर्गादास आंभोरे, महादेव मोरे, राधेशाम खरात,गौतम नरवाडे, कुणाल माने, अख्तर कुरेशी, संतोष खरात,अंकुश हिवाळे, अनिल धांडे,श्रीकृष्ण शेटाणे,सचिन गवई,संदिप राऊत,राहुल मोरे,देवानंद अवसरमोल,अकुंश राठोड, गजानन सरकटे,विजय सरकटे, नितीन गवई,रवि मगर,शुभम नरवाडे, नितीन बोरकर, लक्ष्मीताई कस्तुरे, राधाताई यंगड,प्रियंका मगर आदि शासकिय सबंधित प्रशासन व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा