भारतीय संविधान संपले तर भारताचे तुकडे होतील- ॲड.डॉ. अरुण जाधव

कर्जत (प्रतिनिधी)
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी हे संविधान तयार झाले.संविधान तयार करण्यासाठी दोन वर्षे 11 महिने 18 दिवस लागले. आपल्या जीवनात सकाळपासून तर झोपेपर्यंत जे नियम पाळतो हे संविधानाने दिले आहे. जात, धर्म,व पंथ एकत्रित ठेवण्याचे काम संविधान करीत आहे. असे प्रतिपादन कर्जत येथील नवसरवाडी येथील संविधान प्रबोधन मेळाव्यात ॲड.डॉ.अरुण जाधव यांनी केले. पुढे जाधव म्हणाले या देशातील प्रत्येक माणसाला संविधानाने सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. संविधानामुळे माणसाला व या देशाला समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय मिळत आहे. त्यामुळे संविधान प्रत्येकाच्या घरात गेले पाहिजे. तसेच स्वतंत्र पूर्व काळात लोकशाही नव्हती. तर हुकूमशाही होती. संविधानाने श्रीमंतापासून तर गरिबांपर्यंत समान अधिकार दिले. आणि संविधान हे एका जातीपुरते नाही. तर हे सर्व जातीसाठी समान आहे. सर्व जाती धर्मागील लोकांना एकसंघ बांधून ठेवण्याचे काम करत आहे. संविधान संपले तर देशाचे तुकडे होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे सर्वानीच संविधानाप्रती आदर बाळगला पाहिजे. तसेच.प्रा विक्रम कांबळे सर बोलताना म्हणाले की, लोकांची पूर्वीची परस्थिती व आजची परिस्थिती यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे हे सर्व शक्य झाले ते फक्त संविधानामुळे. आजच्या तरुण पिढीने संविधानाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. जो पर्यंत आपल्याला संविधान समजत नाही तोपर्यंत आपल्याला या समाजातील समाजकंटक नीट जगू देणार नाही. आपण संविधानाच्या माध्यमातून या होणाऱ्या अन्याय विरुद्ध आवाज उठवू शकतो आणि हे सर्व शक्य होऊ शकते ते फक्त संविधान अभ्यासाने.तसेच पत्रकार निलेश दिवटे यांनी अतिशय मोजक्या शब्दांत संविधान काय आहे हे समजून सांगितले व गावकऱ्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी गेवराई वरून आलेले मा. कबीर कांबळे यांनी संविधान व सद्यस्थितीत लोकांच्या समस्या तसेच मानवाधिकार याबाबत लोकांना माहिती दिली.तर राजेश घोडे सर यांनी संविधान व आज होत असलेले कायद्याचे व लोकशाहीचे हनन या बाबत विस्तृत माहिती दिली.या मेळाव्याचे आयोजन ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या वतीने व ग्रामस्थ नवसरवाडी यांनी केले होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक तुकाराम पवार तर सूत्रसंचालन नंदकुमार गाडे आभार सचिन भिंगारदिवे व आभार शितल काळे यांनी प्रास्ताविका वाचून केले. यावेळी ॲड.डॉ. अरुण जाधव, जी. एस कांबळे, निलेश दिवटे पत्रकार, प्रा. विक्रम कांबळे, कबीर कांबळे, नवनाथ शिंदे, हनुमंत नवसरे व राजेश घोडे यांची भाषणे झाली. तर यावेळी ह. भ. प. कैलास नवसरे, पप्पू भोसले, कल्याण नवसरे, मच्छिंद्र तांदळे, संजय तांदळे, व्यंकट तांदळे, पंडित तांदळे,पोपटी थोरात, कैलास ननवरे, बापू तांदळे, दिसेना पवार, योगिता नवसरे, सोनाली तांदळे, ज्योती तांदळे, विमल तांदळे, वैशाली ननवरे, जयश्री तांदळे, सुनीता कुसळकर व मंगल पवार आदी मान्यवर व महिला उपस्थित होत्या.