मन शांती साठी संगीताचे शिक्षण घेणे गरजेचे – श्रीकांत मांढरे आंतरराष्टीय संगीतकार डॉ.श्री. संदीप दलाल यांचे महापौरांचे हस्ते लायन्स क्लब मिडटावुन च्या वतीने सन्मान

अहमदनगर दि.२२ नोव्हेंबर (प्रतिनिधी) = प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग परिवारातील अमरावती येथील आंतरराष्ट्रीय संगीतकार व कला वैभव संगीत अकादमी चे अध्यक्ष डॉ.श्री संदीप दलाल यांचे सन्मान लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटावून च्या वतीने संस्थापक श्रीकांत मांढरे यांचे हस्ते सन्मान करण्यात आले. या वेळी क्लब चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, , सौ. छाया रजपूत, श्री. प्रसाद मांढरे, संदीप चौहान, सौ. सुनंदा तांबे, सौ. स्वाती जाधव, अरविंद साठे, श्री. नरेंद्र मुळे, राजेंद्र म्याना व डॉ शरद ठुबे व सौ. कल्पना ठुबे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
या वेळी बोलतांना मांढरे म्हणाले, संगीत हा जीवनातला अविभाज्य घटक आहे. दलाल यांचे कार्य ईश्वरी कार्य असून त्यांनी याचे शिक्षण जास्तीत जास्त लोकांना द्यावे. मन शांती साठी संगीताचे शिक्षण घेणे गरजेचे आहे.
या वेळी क्लब चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी श्री संदीप दलाल यांच्या बाबत माहिती देतांना सांगितले की, दलाल यांनी एम ए, बी एड, पी एचडी संगीत अलंकार शिक्षण घेतलेले आहे. तसेच शास्त्रीय संगीत व तबल्या मध्ये अलंकार ही पदवी धारण केलेले असून कला वैभव संगीत अकादमी चे अध्यक्ष म्हणून काम करीत असून सदर संगीत अकॅडमी ला गेल्या तीन पिढ्यांचा वारसा लाभला आहे.
संपूर्ण भारत व परदेशातील 20 पेक्षा जास्त देशात संगीत शिकवण्याचे कार्य केलेले असून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील आदिवासी मुलांना संगीत शिकवण्याचे कार्य करीत आहेत.
या कार्यक्रमाचे स्वागत सौ. कल्पना ठुबे यांनी केले, तर सूत्रसंचालन सौ. सुनंदा तांबे यांनी केले व प्रसाद मांढरे यांनी आभार संदीप मानले.