ब्रेकिंग
नगर शहरात आज पाणी आले दूषित! सकाळीच नागरिकांची नाराजी!

अहमदनगर (प्रतिनिधी) महानगर पालिकेची मुख्य जलवाहिनी फुटल्याने त्याचे काम महानगर पालिकेच्या वतीने सुरू होते.त्यामुळे शुक्रवार दिनांक .११/११/२०२२ रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागाचा उदा . सिद्धार्थ नगर ‘ लालटाकी’ दिल्लीगेट’ चितळे रोड, तोफखाना, नालेगांव ‘ कापड बाजार , आनंदि बाजार, नवीपेठ, माणिक चौक इ. भागास पाणी पुरवठा बंद होता. या भागास आज शनिवार दि.१२/११/२०२२ रोजी पाणी पुरवठा नियमित वेळेत झाला. परंतु पिण्याचे पाणी अत्यंत दूषित व अस्वच्छ आल्याने या भागतील नागरिकांच्या दूषित पाण्याविषयी नारजीचा सूर व्यक्त होत आहे. उद्या शहराच्या ज्या भागात पाणी सुटणार आहे . त्या भागात तरी स्वच्छ पाणी सुटावे अशी चर्चा शहरातील नागरिकांमध्ये होत आहे.