उपनगरातील “या” ठिकाणी चालतोय सोरट, बींगो अन मटका! पोलीस का देत नाहीत खाकीचा फटका!

अहमदनगर ११ नोव्हेंबर (प्रतिनिधी) शहरातील व उपनगरातील तोफखाना पोलीस ठाण्याची हद्द मोठी आहे.या हद्दीत चालणाऱ्या अवैध धंद्याची संख्याही मोठीच आहे.तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एकविरा चौक या ठिकाणी असलेल्या बस स्टँडच्या मागील बाजूस बींगो अन मटका बिनदिक्कतपणे सुरू असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे सकाळच्या वेळेस शाळकरी मुले शाळेत जात येत असतात.तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर जाणे येणे सुरू असते.अशा गजबजलेल्या ठिकाणी हे धंदे सुरू असल्याने या ठिकाणी मटका,बींगो, सोरट खेळायला येणारे बऱ्याच वेळेला दारू पिऊन आल्यामुळे भांडणे,मारामाऱ्या होत असतात.त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त असल्याने हे धंदे चालतात तरी कसे? अशा प्रश्नार्थक चर्चा नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. अवैध धंदे करणाऱ्यांना कायद्याचा धाक आहे की नाही?याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने सोरट, बींगो अन मटका! पोलीस का देत नाहीत खाकीचा फटका! असे वाक्य सहजपणे नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या बाबतीत पोलीस कधी धकविणार खाकीचा धाक हाच महत्वाचा प्रश्न आहे.आम्ही उपनगर व शहरातील अवैध धंद्याची माहिती उजेडात आणणारच आहोत. (भाग:१)