अभिषेक भगत यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी)- बुऱ्हानगर येथील तुळजाभवानी मंदिराचे पुजारी अभिषेक विजय भगत यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ करण्याच्या कारणावरून तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. असून फिर्यादी विनोद साळवे यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत हकीकत अशी की विनोद साळवे हे धर्मदाय आयुक्त कार्यालय येथे तुळजाभवानी मंदिराच्या प्रकरणासंदर्भात सुनावणी होती.व सुनावणीनंतर पुढील तारीख मिळाल्याने फिर्यादी व साक्षीदार हे कार्यालयाच्या पार्किंग मध्ये जवळून जात असताना अभिषेक भगत यांनी विनोद साळवे यांना दमदाटी करत तुमचे येथे काय काम आहे तुम्हाला जास्त झाले का आमच्या तुकड्यांवर जगता तुम्ही या ठिकाणी तुमचं काय काम आहे अशी दमदाटी करून जातीवाचक शिवीगाळ केली तसेच मी पेशाने वकील असल्याने मी कोणाला घाबरत नाही काय करायचे ते करून घ्या असा दम दिला. त्यानंतर विनोद साळवे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेऊन अभिषेक भगत यांच्या विरोधात जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.