नेवासा तालुक्यातील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई सुरू असताना देखील जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आर्थिक देवाणघेवाण करून सेवानिवृत्त केले: – प्रकाश पोटे जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन!

अहमदनगर दि. २६ एप्रिल (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ.हंसराज आसाराम पाटेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई सुरू असताना देखील जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आर्थिक देवाण-घेवाण करून अवैद्यरित्या सेवानिवृत्त केले असून या जबाबदार दोषी अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन करून कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देताना जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत दीपक गुगळे, अमित गांधी, शहानवाज शेख, गौतमीताई भिंगारदिवे, पुनम जोशी, गणेश गाडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. नेवासा तालुक्यातील मौजे माका या ठिकाणी 2 ते 3 वर्षापासून कार्यरत होते. व या पशुवैद्यकीय डॉक्टरची एकूणच कारकीर्द ही कायमच वादग्रस्त राहिलेली असून त्यांच्या कामाबाबतच्या अनेक तक्रारी आहेत. यापूर्वी देखील ज्या ठिकाणी नोकरी करत होते त्या ठिकाणचे ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत यांनी वारंवार लेखी स्वरुपात पंचायत समिती नेवासे चे गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत. अशाच प्रकारच्या तक्रारी मुळे डॉ.पाटेकर या पशुवैद्यकीय डॉक्टराला 2018 मध्ये 1 वर्षासाठी निलंबित केले गेले होते. तो 2022 मध्ये माका तालुका नेवासा या ठिकाणी कार्यरत असताना त्यावेळी लंपी या जनावरातील आजारामुळे नेवासा तालुक्यात माका या ठिकाणी सर्वाधिक जनावराचे मृत्यू झाले त्यामुळे हा पशु वैद्यकीय डॉक्टर अधिकच चर्चेत आला होता. तसेच त्यांच्या विरोधात नेवासा तालुक्याच्या पशुसंवर्धन विभागाचे खाते प्रमुख यांनी 7 नोव्हेंबर 2022 रोजी गटविकास अधिकारी यांना तक्रारीचा सविस्तर अहवाल सादर केल्याने त्यावर गटविकास अधिकारी नेवासा यांनी डॉ.पटेकर यांच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाच्या प्राप्त झालेल्या तक्रारीमुळे त्यांना निलंबित करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा प्रस्ताव 11 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हा परिषद अहमदनगर यांना सादर केलेला होता. त्या अनुषंगाने सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पाटेकर यांनी संबंधित विभागाला स्वेच्छा निवृत्ती मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यांच्या विरोधात निलंबनाची तक्रार असताना देखील संबंधित विभागाने कुठल्याही प्रकारची कारवाई किंवा शहानिशा न करता त्यांचे लेखी म्हणणे न घेता केवळ डॉक्टर हंसराज पाटेकर याला या प्रकरणातून वाचवण्यासाठी त्यांच्याकडून अवैद्य आर्थिक तडजोड करून त्याला पळवाट म्हणून त्यांच्या स्वेच्छा निवृत्तीच्या अर्जाच्या नंतर केवळ एक महिना आणि आठ दिवसांनी म्हणजे १२ डिसेंबर 2022 रोजी जाणीवपूर्वक घाईघाईने सर्व नियम पायदळी तुडवत त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आपल्या कार्यालयात असताना त्यांची शासकीय सेवा वर्षभर बाकी असतानाच ताबडतोब सेवानिवृत्ती देऊन त्यांच्यावर होणारी कारवाई जाणून बुजून टाळली. या संपूर्ण प्रकरणाची जिल्हा परिषद विभागाने पूर्णपणे डोळे झाक केलेली आहे. तीन महिन्याचा नोटीस पिरेड पूर्ण होण्यापूर्वीच दीड महिन्यातच स्वेच्छा निवृत्ती मंजुरीचा आदेश काढला गेला. असे असताना कारवाई प्रस्तावित असताना त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या असताना देखील मागच्या काळातील गैरवर्तनीबाबत कारवाई पूर्ण झाली नसताना सेवा निलंबन कालावधीचा निर्णय घेणे बाकी असताना स्वेच्छा निवृत्ती देता येते का? यामध्ये डॉ.हंसराज पाटेकर किती दोषी आहे यापेक्षा त्याला मदत करणाऱ्या भ्रष्ट शासकीय अधिकाऱ्याचा चाललेला काळाबाजार हा स्पष्ट दिसून येत असून या प्रकरणात लक्ष घालावे व या डॉक्टरला पैसे घेऊन अवैद्यरित्या मदत करणारे नेवासे तालुका गटविकास अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, व या निलंबनाची फाईल आपल्याकडे असतानाही निवृत्ती मंजूर करणारे जिल्हा परिषद अहमदनगर चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तत्काळ निलंबित करण्यात येऊन कठोर करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले अन्यथा येत्या पंधरा दिवसात कारवाई झाली नाही तर जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.