जिल्हास्तरीय नेहरु हॉकी क्रीडा स्पर्धांचे आयोजन

अहमदनगर, दि.४ ऑगस्ट (प्रतिनिधी) –* जिल्हा क्रीडा अधिकारी व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर नेहरू हॉकी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयांमधील संघानी सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती भाग्यश्री बिले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
२०२२-२३ या वर्षातील राष्ट्रीयस्तरावरील नेहरू हॉकी क्रीडा स्पर्धा ०२ सप्टेंबर २०२२ पासून नवी दिल्ली येथे होत आहेत. यामुळे जिल्हा विभागस्तरावरील स्पर्धेचे आयोजन १२ ऑगस्ट २०२२ पूर्वी करण्याच्या क्रीडा व युवक संचालनालयाच्या सूचना आहेत. त्यानुसार २०२२-२३ या वर्षातील जिल्हास्तरावरील क्रीडा स्पर्धा १२ ऑगस्ट २०२२ पूर्वी करण्यात येणार आहेत.
या स्पर्धेतील ‘१५ वर्ष मुले (सबज्युनिअर)’ या गटात सहभागी होण्यासाठी १ नोव्हेंबर २००७ किंवा त्यानंतरची जन्मतारीख असावी. ‘१७ वर्षाखालील मुले व मुली (ज्युनियर)’ या गटात सहभागी होण्यासाठी १ नोव्हेंबर २००५ किंवा त्यानंतरची जन्मतारीख असावी.
जिल्हास्तर नेहरू हॉकी क्रीडा स्पर्धा आयोजन व प्रवेशिका याबाबत क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे – ८०८७०७६६३३३ / ८३६९५३९०७७ व महानगरपालिक क्रीडा विभाग प्रतिनिधी विल्सन फिलीप्स – ९४२०७९६१४० यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन ही जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती भाग्यश्री बिले यांनी केले आहे.