सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची मोहीम प्रत्येकाने हातात घेणे काळाची गरज – सुरेश बनसोडे. सामाजिक न्याय भवनच्या कार्यालयाच्या आवारात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून वृक्षरोपण

अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची गरज आहे. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी, जमिनीची धूप थांबविण्यासाठी तसेच ऑक्सिजन देणार्या झाडांची लागवड करून ऑक्सिजनचे प्रमाण वाढवून मानवाचे जीवन सुरक्षित करता येणार आहे. औद्योगिकरणामुळे एकीकडे विकास होत आहे, तर दुसरीकडे पर्यावरणाचा र्हास होत चालला आहे. सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची मोहीम प्रत्येकाने हातात घेणे काळाची गरज असुन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीचे औचित्य साधून वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात आली असून असे प्रतिपादन राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी केले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय अहमदनगर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे, समता दूत प्रकल्प अहमदनगरच्या वतीने नगर मनमाड रोड येथील सामाजिक न्याय भवन येथे वृक्षारोपण राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे व समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांच्या हस्ते रोपे लावून वृक्षरोपण अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी पार्टी प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद, बार्टी नगरचे श्रीमती प्रेरणा विधाते, राहुरी बार्टीचे एजाज पिरजादे, सामाजिक न्याय विभागाचे सहसंघटक अंकुश मोहिते, विकी तिवारी, संजू दिवटे, समीर भिंगारदिवे, नितीन घोरपडे, संजीव परदेशी, येशुदास वाघमारे, दीपक सरोदे, राजू जयस्वार, सुरज कलेये आदी उपस्थित होते.
तसेच पुढे बोलताना सुरेश बनसोडे म्हणाले की पृथ्वीचे अस्तित्व टिकवण्यासाठी, तिचे सौंदर्य हिरवाईने फुलविण्याची गरज आहे. जंगल तोड झाल्याने पर्यावरणाचे प्रश्न निर्माण झाले असून, भविष्याचा विचार करुन वृक्षरोपण व संवर्धन चळवळ काळाची गरज बनले व सामाजिक न्याय भवन येथे येणाऱ्या नागरिकांसाठी देखील मोठ्या प्रमाणात सावली उपलब्ध होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.