वंचित बहुजन आघाडी ला गॅस सिलेंडर निशाणी आरक्षित करावी:- डॉ.सुरेश शेळके

अहमदनगर दि.२ (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी यांना,वंचित बहुजन आघाडी अहमदनगर दक्षिण/उत्तर जिल्हा कार्यकारणी कडून जिल्हा प्रभारी डॉ.सुरेश शेळके यांच्या नेतृत्वाखाली गॅस सिलेंडर निशाणी आरक्षित करण्यात यावे याबाबत निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की,वंचित बहुजन आघाडी हा नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष असून अहमदनगर जिल्हातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगर पंचायत,नगरपरिषद,नगरपालिका,महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाच्या वतीने उभे राहणार्या सर्व उमेदवारांकरिता “गॅस सिलेंडर” ही निशाणी आरक्षित करावी अशी विनंती करण्यात आली.यावेळी वंचित बहुजन आघाडी अहमदनगर दक्षिण/उत्तर जिल्हा पदाधिकारी जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे,विशाल कोळगे,जिल्हा महासचिव योगेश साठे,अनिल जाधव,जीवन पारधे,दत्तात्रय अंधुरे,विजय मकासरे,चंद्रकांत नेटके,दादा समुद्र,पोपट शेटे,विनायक देशमुख,राजू खंडागळे,अरविंद सोनटक्के,विजय साळवे,संजय जगताप,सचिन पाटील,अजीम शेख,अमर निरभवणे,सुनील भिंगारदिवे,देविदास भालेराव,प्रमोद आढाव,बंटी कांबळे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.