महसूल दिनी महसूल अधिकारी -कर्मचाऱ्यांचा झाला सन्मान उपजिल्हाधिकारी संवर्गात संगमनेर उपविभागीय अधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे यांचा सन्मान

*अहमदनगर ०२ ऑगस्ट (प्रतिनिधी) – महसूल दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील उत्कृष्ट महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले व पद्मश्री पोपटराव पवार यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.
१ ऑगस्ट २०२१ ते ३१ जुलै २०२२ या कार्यकाळात उत्कृष्ट कार्य केलेल्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आज अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात गौरव करण्यात आला. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी सोनप्पा यमगर, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, विठ्ठल बुलबुले, निवृत्त कर्नल आर व्ही धुमाळ आदी उपस्थित होते. जिल्ह्यात संगमनेर उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत रामदास मंगरुळे यांची उपजिल्हाधिकारी संवर्गात उत्कृष्ट काम केल्याबद्दल सन्मान करण्यात आला. कर्जत तहसीलदार नानासाहेब आगळे, संगमनेर नायब तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयातील लघुलेखक श्रीमती पल्लवी खेडकर, अव्वल कारकून रामकिशन नलवडे (जिल्हाधिकारी कार्यालय), श्रीमती किशोरी त्र्यंबके (कर्जत तहसील), मंडळाधिकारी सचिन पोटे (पारनेर तहसील), महसूल सहायक श्रीमती वैशाली धायगुडे (जिल्हाधिकारी कार्यालय), कैलास खाडे (अकोले तहसील), तलाठी ऋषिकेश खताळ (श्रीगोंदा तहसील),श्रीराम कुलकर्णी,(जामखेड तहसील), सतीष गायके (कोपरगाव तहसील), वाहनचालक म्हातारदेव मोरे, (श्रीरामपूर उपविभागीय कार्यालय) शिपाई दिपक दिनकर (पाथर्डी तहसील), कोतवाल महेश देशमुख, विकास वर्पे, तुळशीराम शिंदे, पोलीस पाटील कृष्णा अभंग, बाळासाहेब घुले, अंबादास देवकर यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
महसूल अधिकारी – कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले की, महसूल विभाग लोकाभिमुख काम करत असून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समर्पण भावनेने केलेल्या कामामुळे शासनाचे प्रतिमा उजळ होत आहे.
पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की, सर्वसामान्य शेतकरी व कष्टकऱ्यांचे जीवन सुकर करण्याचे काम शासकीय सेवेच्या माध्यमातून अधिकारी आणि कर्मचारी करत असतात.
विठ्ठल बुलबुले यांचे ‘ताण- तणाव व्यवस्थापन’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन संगमनेर उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या वतीने करण्यात आले होते. प्रास्ताविक संगमनेर तहसीलदार अमोल निकम यांनी केले. आभार अकोले तहसीलदार सतिष थेटे यांनी मानले.