सामाजिक
फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन!

अहमदनगर दि.१ (प्रतिनिधी) लोकशाहीर ,साहित्यरत्न, अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्त फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीच्या वतीने सिद्धार्थनगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश प्रवक्ते प्रा.जयंत गायकवाड,आर. पी .आय. चे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक अजय साळवे,देशस्तंभ न्यूज नेटवर्क चे संपादक महेश भोसले,चंद्रकांत भिंगारदिवे, पै.सुनिल भवर आदी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना अन्नदान करण्यात आले.