प्रोफेसर चौक चौपाटी असोसिएशन व अहमदनगर योगा सेंटर चा उपक्रम रोप मल्लखांब, पोल मल्लखांब व एरियल सिल्क च्या चित्तथरारक प्रात्यक्षिक

अहमदनगर दि.२५(प्रतिनिधी)- सावेडी येथील प्रोफेसर चौक येथे प्रोफेसर चौक चौपाटी असोसिएशन व अहमदनगर योगा सेंटर च्या वतीने आमदार अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक रोप मल्लखांब, पोल मल्लखांब व एरियल सिल्क चे प्रकार प्रमुख आकर्षण होते. विविध प्रकार सादर करताना नगरकरांचे डोळ्याचे पारणे फेडले. चित्तथरारक प्रात्यक्षिके सहजपणे सर्व वयोगटातील मुले-मुली सादर करत होती. हे पाहण्यासाठी प्रोफेसर चौक चौपाटी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी आमदार संग्राम जगताप, प्रोफेसर चौक चौपाटी असोसिएशनचे संदिप जाधव, गणेश तुरे, अविनाश धाडगे, बबलू भिंगारे, गणेश साळे, रोहन थापा, निलेश मिसाळ, राजू पवार, दिनेश तेली, नवीन बोहोत, अतिष मट्टू, धीरज वाधवा, विजय भाटिया, आकाश कुलथे आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की प्रोफेसर चौक चौपाटी असोसिएशन संघटना हे आपले व्यवसाय करून सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचे कार्य कौतुकास्पद असून संघटनेच्यावतीने कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना मदत करण्यात आली होती. तसेच संघटनेचा नेहमीच सामाजिक क्षेत्रामध्ये मोलाचा वाटा असतो. व या मल्लखांबचा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना आमदार संग्राम जगताप व्यक्त केली.