क्रिडा व मनोरंजन
जेष्ठ आभिनेत्री आशा पारेख यांना यावर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर!

मुंबई : भारतीय हिंदी सिनेसृष्टीत अत्यंत महत्त्वाचा व मानाचा मानला जाणारा यावर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक दर्जेदार चित्रपटांमुळे दर्शकांच्या पसंतीस उतरलेल्या ६०-७० च्या दशकातील जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर करण्यात आला आहे. आशा पारेख यांनी अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत चित्रपटांमध्ये अभिनय केला असून यामध्ये राजेश खन्ना, शम्मी कपूर, जितेंद्र, अमिताभ बच्चन तसेच धर्मेंद्र इत्यादींचा समावेश आहे.