कौतुकास्पद
जिल्हा रुग्णालयात बिस्कीट व फळे वाटप करत “त्यांनी” केला वाढदिवस साजरा!

अहमदनगर दि.५ जून (प्रतिनिधी) अनावश्यक खर्च टाळत कुठल्याही प्रकारचे हार, पुष्पगुच्छ न घेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी अत्यंत साध्या पद्धतीने जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे व बिस्किट पुडे वाटून वाढदिवस साजरा केला.यावेळी बोलतांना ते म्हणाले,वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून प्रत्येकाने समाज उपयोगी कार्य करत वाढदिवस साजरा करावा.या कार्यक्रम प्रसंगी देशस्तंभ न्यूज नेटवर्क संस्थापक संपादक महेश भोसले,उपसंपादक सुरेश भिंगारदिवे,ना.जितेंद्र आव्हाड युवा मंचच्या जिल्हा अध्यक्षा गौतमी भिंगारदिवे,जितेंद्र आव्हाड युवा मंचचे जिल्हा अध्यक्ष अमोल शिंदे,अमित टेंभरे,प्रकाश गलांडे,हिराबाई भिंगारदिवे,रंजना भिंगारदिवे,राणी शेलार आदीसह जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.