ब्रेकिंग

तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू आहेत एकदम ओके! पोलीस कधी देणार त्यांना ठोके!

तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू आहेत एकदम ओके! पोलीस कधी देणार त्यांना ठोके!

अहमदनगर (प्रतिनिधी) नगर शहरातील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे मटका,बिंगो,दारू ,जुगार सुरू असल्याचे चित्र आहे.नव्यानेच पोलीस अधीक्षक पदावर रुजू झालेले राकेश ओला साहेब यांनी पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे घेतल्यानंतर अवैध धंदे करणाऱ्याची गय केली जाणार नाही.ही भूमिका स्वागताचीच होती.त्या अनुशंगाने कारवाई होत आहे.परंतु प्रत्येक पोलीस ठाण्याचा विचार केला तर ठाण्याच्या हद्दीतील मटका, बिंगो,दारू,ताडी या अवैध धंद्यांवर कारवाई होताना दिसत नाही.
तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीचा आपण विचार केला तर या हद्दीत अवैध धंदे सुरू आहेत.एकदम ओके!मग कधी मिळणार त्यांना कायद्याचे ठोके! अशा चर्चा सर्व सामान्य नागरिकांमधून व्यक्त होणे हे स्वाभाविकच आहे.लवकरच याबाबतीत कोणत्या भागात सुरू आहेत अवैध धंदे हे आम्ही आपणा समोर माडणारच आहोत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे