सामाजिक

परभणी प्रकरणी जामखेड शहरात भिमसैनिकांनी निषेध व्यक्त करत प्रशासनास दिले निवेदन सदर आरोपीवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा

जामखेड तालुका प्रतिनिधी (रोहित राजगुरु )
परभणी शहरात दि.9 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधान प्रतीकृतीची एका इसमाने विटंबना केली याची वार्ता शहरात पसरता हजारोंच्या संख्येने संविधान प्रेमी नागरिकांनी आरोपीस पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले संतप्त नागरिकांनी परभणी बंदची हाक दिली होती..
भारतीय संविधानाचा अपमान म्हणजे डाॅ.बाबासाहेब आंबेडकरचा अपमान होय संविधान आमचा आत्मा अशा भावना निर्माण होऊन आंबेडकरी समाजाने रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला..जामखेड शहरात देखील सदर प्रकरणाचे पडसाद उमटले आरोपीवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यामागणीसाठी संतप्त शेकडो भिमसैनिकांनी तहसिलदार यांना दिले निवेदन….
सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांकडून देखील निषेध व्यक्त करण्यात आला याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक अँड.अरुण जाधव,भाजपाचे ता.अध्यक्ष अजय काशिद,राष्ट्रवादीचे नेते शहाजी राळेभात,शहराध्यक्ष वसीम ( सय्यद,डाॅ.कैलास हजारे,उपस्थित होते..
यावेळी भिमसैनिक सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले,भिमटोला ग्रुपचे बापुसाहेब गायकवाड,डिप्लोमा काॅलजचे प्रा.विकी घायतडक सर,वंचितचे ता.अध्यक्ष अतिश पारवे, बापुसाहेब ओव्हळ,विशाल अब्दुले,प्रा.सुनिल जावळे,दादासाहेब घायतडक,रिपाईचे ता.अध्यक्ष प्रमोद सदाफुले,उपाध्यक्ष रवि सोनवणे,मनसे ता.उपाध्यक्ष सनी सदाफुले,डाॅ.सचिन घायतडक,सचिन सदाफुले,मुकुंद घायतडक,विष्णु घायतडक, नामदेव गंगावणे,किशोर सदाफुले,गणेश घायतडक,रवि सदाफुले,विनोद घायतडक,किशोर काबंळे,बाळु काकडे,देवा मोरे,जोगेंद्र थोरात,सुर्यकांत सदाफुले,रवि डाडर,लखन मोरे,दिपक घायतडक,सुव्हास आव्हाड सर,सनी प्रिन्स सदाफुले,प्रतिक सदाफुले,विकीभाई गायकवाड,अजित घायतडक,अक्षय घायतडक,अक्षय गायकवाड,किरण सदाफुले,भारतीय बौद्ध महासभेचे महिला जिल्हा सचिव सुरेखा सदाफुले,अरुणा सदाफुले,शैला सदाफुले,कुसुम साळवे आदी शेकडो भिमसैनिक व संविधान प्रेमी नागरीक उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे