गुन्हेगारी

सराईत मोबाईल चोरटा अरबाज पठाणला अटक. एकुण 44000/- रु.किं. चे चार मोबाईल जप्त, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनची कामगिरी

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :दिनांक 01/02/2025 रोजी रात्री 10/30 वा. सुमारास फिर्यादी नवनाथ माणिक जाधव, वय-39 वर्षे, धंदा- नोकरी, रा. गोंधवणीरोड डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी वॉर्ड नं. 01 श्रीरामपूर जि. अहिल्यानगर हे जेवण झाल्यानतंर श्रीरामपूर ते गोंधवणी जाणारे रोडवरती फेरफेटका मारत असताना राज एंटरप्राईजेस प्रेट्रोलपंपा जवळ आले असता त्यांच्या पाठीमागुन एका मोटारसायकलवर अनोळखी इसम आला व त्याने फिर्यादीच्या हातातील ते वापरत असलेला 7000/- रु. किं.चा ओप्पो कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाईल बळजबरीने हिसकावुन घेवुन संजयनगरच्या दिशेन भरधाव वेगात निघुन गेला वगैरेच्या तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं. 95/2025 बी.एन.एस. कलम 309 (4) प्रमाणे दिनांक 02/02/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा दाखल होताच मा. पोनि. नितीन देशमुख यांनी तपास पथकास सदर अनोळखी इसमाचा व गेले मालाचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाने तात्काळ घटनास्थळी जावुन पाहणी केली व तांत्रिक विश्लेषंण करुन व गुप्त बातमीदार मार्फत माहिती घेवून सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी नामे अरबाज आयुब पठाण, वय 24 वर्षे, रा. हुसेननगर, वार्ड नं.01, श्रीरामपूर यांने केल्याचे निष्पण झाल्याने त्याचा शोध घेतला असता सदरचा आरोपी हा त्याचे राहते घरी आला असल्याची माहिती मिळाल्याने तपास पथक तत्काळ त्याचे राहते घरी गेले असता सदरचा आरोपी हा तपास पथकास पाहुन पळुन जावु लागला तेव्हा तपास पथकाने त्यास जागीच पकडुन त्याच्याकडे सदर गुन्हयातील चोरी केलेला मोबाईल बाबत चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास नमुद गुन्हयात तात्काळ अटक करण्यात आली. अटक कालावधीत त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याच्याकडुन वेगवेगळया ठिकाणावरुन चोरी केलेले खालील वर्णानाचे चार मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत त्याचे वर्णन खालील प्रमाणे.1) 7,000/- रु. किंमतीचा ओप्पो कंपनीचा K 10, 5G निळया रंगाचा मोबाईल त्याचा IMEI NO.1)860239062196731,2)860239062196723 असा असलेला जुवाकिंअं. (गुरनं. 95/2025 बी.एन.एस.309 (4) प्रमाणे गुन्हयातील मोबाईल)2)12,000/-रु. किं.चा. एक रेडमी कंपणीचा मोबाईल त्याचा IMEI NO. 1)863199065293769, 2) 863199065293777 असा असलेला जुवाकिअ.3)10,000/-रु.किं.चा एक विवो कंपनीचा मोबाईल त्याचा IMΕΙ ΝΟ. 1) 863675073427242 2)863675073427259 असा असलेला जुवाकिअ.4)15,000/-रु.कि.चा एक इनफिनिक्स कंपणीचा मोबाईल त्याचा IMEI NO. 1) 356805361300025 2)356805361300033. असा असलेला जुवाकिंअ.44,000/-रु.कि.चे मोबाईल जप्त करण्यात आले.वरील वर्णनाचे व किंमतीचे मोबईल सदर आरोपीकडुन जप्त करण्यात आले आहेत व सदर आरोपीस नमुद गुन्हयात अटक करण्यात आली व सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणला आहे.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्म साहेब तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख, यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोना/ शरद अहिरे, पोकों/संभाजी खरात, पोकों/अमोल पडोळे, पोका/मच्छिंद्र कातखडे, पोकों/अजित पटारे, पोकों/अमोल गायकवाड, पोकों/आजिनाथ आंधळे, पोकों/सागर बनसोडे, मपोकॉ मिरा सरग यांनी केली यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साो. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके हे करीत आहेत.आरोपींवर यापुर्वी दाखल असलेले गुन्हे खालील प्रमाणे1) अरबाज आयुब पठाण, श्रीरामपूर शहर पो.स्टे.1) गुरक्र. 300/2023 भादंवि 379 प्रमाणे.वय 20 वर्षे, रा.2) गुरक्र. 295/2023 भादंवि 379 प्रमाणे.हुसेननगर, वार्ड नं.01,3) गुरनं, 683/2023 भादंवि कलम 379 प्रमाणे,श्रीरामपूर,4) पो.स्टे. गुरनं. 916/2023 भादंवि कलम 379 प्रमाणे,5) गुरक्र. 973/2023 भादंवि 379,34 प्रमाणे.अशी माहिती श्रीरामपूर शहराचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली’
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे