निधन

माजी महापौर संदीपदादा कोतकर यांना पितृशोक अहिल्यानगर शहरातील जेष्ठ नेते कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांचे निधन

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 24 ऑक्टोबर : अहिल्यानगर महानगरपालिकेचे माजी महापौर संदीपदादा कोतकर यांना पितृशोक झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे,
अहिल्यानगर मधील ज्येष्ठ नेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास एकनाथ कोतकर (वय 74) यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांना हृदय विकाराचा त्रास झाल्याने सकाळी येथील आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, तेथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी मुले, सुना, नातंवंडे, जावई, पुतणे, तसेच कार्यकर्त्यांचा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने अहिल्या नगर शहरात व जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. अहिल्यानगर महानगर पालिकेचे माजी महापौर संदीप कोतकर यांचे ते वडील होत.
दिवंगत भानुदास एकनाथ कोतकर यांना देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏🙏🙏🙏

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे