जितेंद्र आव्हाड युवा मंच प्रदेश सरचिटणीस पदी मुबीन मुल्ला (आष्टेकर) यांची निवड

मुंबई-दि.१३ मार्च (प्रतिनिधी) शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा जोपासत काम करणारे राज्याचे गृहनिर्माण मंत्री नामदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष प्रमोद सरोदे यांच्या नेतृत्वाखाली जितेंद्र आव्हाड युवा मंचच्या प्रदेश सरचिटणीस पदी मुबीन मुल्ला (आष्टेकर) यांची निवड ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आली आहे. मुल्ला पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून गेल्या दोन वर्षापासून काम करत होते राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या पुरोगामी विचारांचा वसा आणि वारसा पोहोचवण्याचे काम केले आहे मराठवाडा, विदर्भ, कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्र या भागात मोठ्या प्रमाणावर संघटन बांधण्याचे व राज्यातील ओबीसी बांधवांसाठी संघटन बांधणीचे सुद्धा काम त्यांनी केले त्यामुळे पदोन्नती म्हणून त्यांची सरचिटणीस पदी निवड करण्यात आली यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रमोद सरोदे, मुंबई अध्यक्ष अभिषेक कदम, विदर्भ अध्यक्ष आकाश धवसे, अमरावती विभाग अध्यक्ष नकुल पाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सचिन सूर्यवंशी, अनिल भोयर, शुभम मेश्राम तसेच राज्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या निवडीबाबत अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अमोल शिंदे,महिला जिल्हा अध्यक्षा गौतमी भिंगारदिवे,बाळासाहेब ढवळे, यांनी अभिनंदन करत पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.