केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले यांच्या शुभहस्ते अहमदनगर संपर्क कार्यालयाचे उदघाटन

अहमदनगर दि.१३ मार्च(प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले जिल्ह्याच्या दौर्यावर आले असता.अहमदनगर शहरातील स्वास्तिक चौक येथे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या अहमदनगर संपर्क कार्यालयाचे उदघाटन त्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी अहमदनगर संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कापसे,जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे,शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे,नगरसेवक राहुल कांबळे,युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे,जेष्ठ नेते संजय कांबळे,महिला जिल्हाध्यक्ष आरती बडेकर,नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले,शहर जिल्हाउपाध्यक्ष योगेश त्रिभुवन,भिंगार शहराध्यक्ष आकाश तांबे,युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रविण वाघमारे,कर्जत तालुकाध्यक्ष संजय भैलुमे,पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरु,कृपाल भिंगारदिवे,ग्रा.पं.सदस्य शैलेश भोसले,विवेक थोरात,अविनाश उमाप,यशराज शिंदे,सुरज भिंगारदिवे,प्रतिक नरवडे,वैभव बनसोडे,करण भिंगारदिवे,बंटी गायकवाड,विशाल कदम व आदि उपस्थित होते.